ETV Bharat / state

Crop Protection Idea : पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचे जुगाड; पाहा, काय केलंय गड्यानं? - वाशिम पीक संरक्षणासाठी जुगाड

पीक संरक्षणासाठी (Cr0p Protection) आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणे याचे प्रयोग केलेले पाहिले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून पिकांचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्याने पीक संरक्षणासाठी नवीन जुगाड (Farmer Unique Idea) तयार केले आहे. गजानन शेळके असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

Crop Protection
पीक संरक्षणासाठी जुगाड
author img

By

Published : Apr 7, 2022, 3:36 PM IST

Updated : Apr 7, 2022, 5:48 PM IST

वाशिम - पीक संरक्षणासाठी (Cr0p Protection) आतापर्यंत तुम्ही गोफण, बुजगावणे याचे प्रयोग केलेले पाहिले असतील. यामध्ये कष्ट तर आहेच पण हे प्रभावी नसल्यामुळे पक्षांपासून पिकांचे संरक्षण होईलच असे नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ढोणी गावच्या शेतकऱ्याने पीक संरक्षणासाठी नवीन जुगाड (Farmer Unique Idea) तयार केले आहे. यापासून ज्वारी, हायब्रीड याचा एक दाणाही पक्षांच्या तोंडी जाणार नाही. यामुळे पिकांचे संरक्षण तर होत आहे, पण सध्याच्या कडक ऊनापासून त्या शेतकऱ्याचा बचावही होत आहे.

पीक संरक्षणासाठी जुगाड

शेतात बांबूच्या मदतीने हांडे बांधले - गजानन शेळके यांनी घेतलेले ज्वारीचे पीक हे अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्प्यातील पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेळके यांनी चक्क घरातील हांडे वापरले आहेत. दोन एकर शेतात त्यांनी बांबूच्या मदतीने हांडे बांधले आहेत. शेळके यांनी त्या हंड्यात लहा दगड, गोटे टाकून त्यास कापडाने बंद केले आहेत. एक एकरात त्यांनी ४ ते ५ हांडे बांधून त्याची दोर शेकळे यांनी त्यांच्याकडे ठेवली असून, ती दोर ते सतत हलवतात. दोरीने हलवल्याने त्या हंड्यातील दगड, गोटेचा मोठा आवाज येतो. या आवाजामुळे पक्षी तसेच जनावरे पिकांकडे फिरकतसुद्धा नाहीत. शेळके निवांत सावलीत बसून पिकांचे संरक्षण करत आहेत.

पीक संरक्षणासाठी मदत - यंदा रब्बी हंगामात पिके जोरात बहरत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आला होता. मात्र, आता तो थांबला असून, आता पिकांची वाढ जोमात होत आहे. ज्वारी, हरभरा आणि हायब्रीडची पिके अंतिम टप्यात आहेत. पाण्याचा साठा असल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीमध्ये मोठा बदल केला असून, तो यशस्वी देखील झाला. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे न भरून निघणारे नुकसान झाले होते. मात्र, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अशा आहे. अंतिम टप्प्यात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पीक संरक्षण करत आहेत.

सकाळ-संध्याकाळ पक्षांकडून पिकांचे नुकसान - रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना पक्षांकडून त्या पिकास धोका असतो. शेतामध्ये पक्षांचा सकाळ आणि संध्याकाळी गोंगाट हा ठरलेला असतो. पक्षांचे थवे ना थवे ज्वारीच्या कणसावर येऊन बसतात. यामुळे पिकांचे नुकसान तर होतेच पण सोबतच पिकाच्या उत्पादनात देखील घट होते. शेळके यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे इतर शेतकरीसुद्धा प्रभावित झाले आहेत.

Last Updated : Apr 7, 2022, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.