वाशिम - जिल्ह्यातील पेडगाव येथील वासुदेव तुळशीराम राठोड (वय ६०, रा. पेडगाव) यांनी गावाच्या बाजूच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्याकडे २ एकर शेती आहे. मात्र, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्यावर भारतीय स्टेट बँकेचे ४० हजार रुपये कर्ज होते. कोरोनाच्या युद्धात घर चालविण्यासाठी हाताला काम नव्हते आणि नवीन शेती पेरणी कराला पैसा नव्हता या काळजीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती परिवारातील सदस्यांनी दिली आहे.
कर्जाला कंटाळून पेडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या - washim farmer suicide
सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना पेडगाव येथे घडली आहे.