वाशिम - जिल्ह्यातील रिसोड-मालेगाव मार्गावर शिरपूर जवळील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायील मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, कच्चा रस्ता पावसाने भिजल्याने या ठिकाणी निर्माण झालेल्या चिखलात एक अवजड कंटेनर अडकल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे रिसोड मालेगाव मार्गावरील वाहतूक उशीरापर्यंत ठप्प झाली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास तब्बल ६ तासानंतर जेसबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आहे.
रीसोड मालेगाव या मार्गावरील रस्ताचे काम सुरू आहे. या मार्गातील शिरपूर जवळ पूलनिर्मितचे काम सुरू आहे. यामुळे कंत्राटदाराने तात्पुरता केलेला पर्यायी रस्ता रिमझिम पावसाने चिखलमय झाला आहे. मध्यरात्री पासून एक अवजड कंटेनर या पुलाच्या कामात फसल्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक ठप्प झाली होती. सात तासाच्या प्रयत्नाने अखेर जेसीबी सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात यश आले आहे.