वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रोडवरील वाघीच्या समोरील नाल्यामध्ये मंगळवारी दोन जुलैला 4 मुले पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामधील गावकऱ्यांनी 2 मुलांना वाचविण्यात यश आले. तर दोघे बहीण भाऊ बेपत्ता होते. त्यामधील पारस बाळू पवार (वय 8 वर्ष ) याचा आज मृतदेह आडोळ प्रकल्पात तरंगताना सापडला.
वाघी बुद्रुक येथे चार मुले नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. त्यामध्ये ओमकार राधेश्याम पवार व शुभम अनिल पवार या दोघांना गावकऱ्यांना वाचविण्यात यश आले. तर पूजा बाळू पवार वय 14 वर्ष, तर तिचा भाऊ पारस बाळू पवार वय 8 वर्ष यांना शोधण्यासाठी आज पहाटेपासून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे शोधकार्य सुरू होते. मात्र सहा वाजेपर्यंत या पथकाने त्या दोन्ही भाऊ बहिणीला शोधण्यास अपयश आले.
थोड्याच वेळात गावकऱ्यांनी आडोळ प्रकल्पात एक मृतदेह तरंगताना दिसला व याची माहिती शोध कार्य करणाऱ्या पथकाला देण्यात आली व मृतदेह बाहेर काढण्यात आले. हा मृतदेह पारस पवार वय आठ वर्ष याचा असून याची बहीण पूजा अद्यापही बेपत्ता आहे. शोध कार्य थांबले असून उद्या पहाटे पुन्हा सुरू होणार आहे.