वाशिम - जिल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित करण्याकरिता सोमवारी दुपारी १२.३० वाजता सोडत आयोजीत करण्यात आली होती. दरम्यान, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत पार पडली.
पंचायत समितींच्या सभापती पदांचे आरक्षण निश्चित सोडतीमध्ये वाशिम पंचायत समिती अनुसूचित जाती महिला, मालेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, कारंजा सार्वसाधारण महिला, मानोरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मंगरुळपिर सर्वसाधारण तर रिसोड पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिला करिता राखीव करण्यात आले. सर्व पंचायत समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाची निवड १६ जानेवारी रोजी होणार आहे.हेही वाचा - आज के शिवाजी.. तर शिवरायांच्या वंशजांनी पदांचे राजीनामे द्यावेत