ETV Bharat / state

...म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीची इच्छामरणाची मागणी - आत्महत्याग्रस्त शेतकरी

आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या पत्नी सोनाली लांडगे यांना शासनाने नोकरी दिली होती. परंतू, ही नोकरी शासनाने हिसकावून घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिले आहे.

सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिले आहे.
author img

By

Published : Aug 2, 2019, 6:33 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील जऊळका येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या पत्नी सोनाली लांडगे यांना शासनाने नोकरी दिली होती. परंतू, ही नोकरी शासनाने हिसकावून घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिले आहे.

सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली असून, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना तहसीलदारामार्फत निवेदन दिले आहे.

सोनाली यांचे शेतकरी पती दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून 10 सप्टेंबर 2015 रोजी आत्महत्या केली होती. संबंधित पत्रात त्यांनी दुष्काळ व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सोनाली यांची वाशिम जिल्हाधिकाऱयांनी मदतनीस पदावर नेमणूक केली. दरमहा मिळणारे ७हजार रू मानधन हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी उपजीविकेचे साधन होते.

परंतू, वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 11 जून 2018 रोजी त्यांना सेवेतून कमी केले. त्यामुळे लांडगे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, राज्यमंत्री डॉ रणजित पाटील तसेच आमदार अमित झनक यांच्याकडे निवेदन देऊन सेवेत सामावून घेण्यायाठी विनंती केली. मात्र, आजपर्यंत त्यांना सेवेत सामावून घेतले नाही.
यानंतर, सेवेत सामावून घ्या; अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी सोनाली लांडगे यांनी निवेदनात केली आहे.

त्यांनी निवेदनाच्या प्रती राज्यपाल, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टिवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवल्या आहेत.

Intro:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीची  इच्छामरणाची मागणी

वाशिम : जिल्ह्यातील जऊळका  येथिल आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या  पत्नी सोनाली लांडगे यांनी   शासनाने दिलेली  नोकरी  हिसकावून घेतल्याने उपासमारीची पाळी आल्याने मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे .

आज  ता .2 ऑगस्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारा मार्फत निवेदन दिले आहे .निवेदनात म्हटले आहे की  ; त्यांचे  शेतकरी पती दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे  पत्र लिहून आत्महत्या 10 सप्टेंबर 2015 रोजी केली होती .त्या पत्रात त्यांनी नापीकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे म्हटले आहे .त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सोनाली लांडगे यांना जिल्हाधिकारी वाशिम यांनी मदतनीस पदावर नेमणूक 20 सप्टेंबर 2015 ला  दिली होती . त्यांना दरमहा   मिळणारे  7 हजार रुपये मानधन त्यांच्या  व त्यांच्या मुलांच्या उपजीविकेचे साधन  होते
असे असताना जिल्हाधिकारी यांनी 11 जून  2018 ला  त्यांना  सेवेतून कमी केले .त्यामुळे त्यांच्या वर व त्यांच्या मुलांवर उपासमारीची पाळी आली  आहे. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी ; पालकमंत्री ; राज्यमंत्री डॉ रणजित पाटील ; आमदार अमित झनक यांच्याकडे  निवेदन देऊन सेवेत सामावून घेण्याची विनंती केली .परंतु आजपर्यंत त्यांना  सेवेत सामावून घेतले नाही .त्यामुळे त्यांनी  निवेदनात मागणी  केली आहे की  त्यांना सेवेत सामावून घ्या अन्यथा  इच्छा  मरणाची परवानगी  दया अशी मागणी  निवेदनात  केली  आहे .

निवेदनाच्या प्रतीलीपी  राज्यपाल ; विधानसभेचे विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टिवार ;विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे  ; शिवसेना पक्ष प्रमूख  ऊध्दवराव ठाकरे ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  याना  पाठविल्या आहेत .Body:फीड सोबत आहेतConclusion:फीड सोबत आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.