वाशिम - कारंजा तालुक्यातील मोहगव्हान येथील कांचन अघम आणि अभिषेक अघम या दोघा भावा-बहिणीने शुक्रवारी सायंकाळी बाजारातून आणलेली केळी खाल्ली, यामुळे त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. यानंतर त्यांना तात्काळ कारंजा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पैकी अभिषेकला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. मात्र, कांचनचा मृत्यू झाला.
हेही वाचा - ...त्यामुळे गौतम बुद्ध जेवढे महत्वाचे तेवढेच छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराज - खासदार संभाजीराजे
कारंजा तालुक्यातील मोहगव्हान येथील अघम यांच्या घरी 27 तारखेला कारंजा बाजारातून केळी आणली होती. दरम्यान, कांचन आणि अभिषेक अघम यांनी ही केळी खाल्याने त्यांना अस्वस्थ वाटायला लागले. यामुळे त्या दोघांना तात्काळ कारंजा येथील खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. मात्र, कांचनची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावतीला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे, तर अभिषेकवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - सरकारचा कांदा निर्यातबंदीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्याला मातीत घालण्याचे षडयंत्र - डॉ. अजित नवले
दिवसेंदिवस फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर वाढत आहे. मात्र, अन्न औषध प्रशासनाचे याकडे कोणतेही लक्ष नाही. दरम्यान, या हलगर्जीमुळेच कांचनला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिक नागरिकांना केला असून घातक रसायनांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर, बाजारातून आणलेली फळे खाण्याआधी व्यवस्थीत धुवून घ्यावीत, असा सल्ला डॉक्टर अजय कांती यांनी दिला आहे.
हेही वाचा - 'काश्मीरमधील लोकांवर बंधने नाहीत, विरोधक चुकीची माहिती देताहेत'