वाशिम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदा गणेश विसर्जन मिरवणूक प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी वाशिम नगरपरिषदेकडून विषेश व्यवस्था करण्यात आली आहे. शहारातील विविध प्रभागामध्ये 25 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. घरगुतीसह सार्वजनिक गणपतीची आरती करून वाशिम शहरातील देव तलावात विसर्जन करण्यात येत आहे. महत्वपूर्ण बाब म्हणजे या विसर्जनादरम्यान हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडत आहे. श्री विसर्जनाच्या कार्यात मुस्लिम बांधव उस्फुर्तपणे सहभागी झाले आहेत.
वाशिम शहरातील देव तलावात घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन मुस्लिम बांधवांच्या हस्ते करण्यात येत आहे. नगरपरिषदेकडून तयार करण्यात आलेले विसर्जन रथ प्रत्येक प्रभागात तैनात आहेत. या रथाद्वारे तसेच पोलीस व नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने विसर्जन करण्यात येत आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधवही विसर्जन कार्यात सहभागी झाले आहेत. वाशिम येथील जुम्मा शहा गेल्या 11 वर्षांपासून गणेश विसर्जनात सहभाग घेतात.
हेही वाचा - कोल्हापुरात नियमांचे उल्लंघन; शिवाजी मंडळाने सुरू केली २१ फुटी गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक