वाशिम - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिध्द सैलानी बाबा यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा आर्थिक फटका एसटी (लालपरी) बसला आहे. दरवर्षी या यात्रेसाठी वाशिम, कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर आगारातून विशेष एसटी बस सोडल्या जातात. मात्र, कोरोनामुळे यंदा त्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील चार आगारातून 46 बस 238 फेऱ्यांच्या माध्यमातून सुमारे 12 लाखापेक्षा अधिकचे उत्पन्न दरवर्षी मिळते. मात्र, यंदा यात्राच रद्द झाल्यामुळे एसटीला लाखोंचा आर्थिक फटका बसला आहे.