वाशिम - जगभर पसरलेल्या कोवीड-19 अर्थात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील विविध यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहे. राज्यात काही ठिकाणी बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत तर काही ठिकाणी मालाची आवक कमी झाली आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कोरोनाच्या प्रभावामुळे सोयाबीनची आवक घटली. बाजार समितीत दररोज ३ हजार क्विंटल होणारी आवक दोन दिवसात ३०० क्विंटलपर्यंत खाली आली आहे.
हेही वाचा - गुढीपाडव्याचा बांधकाम उद्योगाचा हा 'मुहूर्त' कोरोना चुकविणार
तूर, हरबरा या पिकांचीदेखील आवक कमी झाली आहे. उन्हाळ्यात शेती मशागतीच्या कामासाठी नगदी पैश्यांची गरज असते. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतो. यंदा मात्र, कोरोनाच्या धास्तीने बाजारात शेतमाल आणणे शक्य नसल्याने शेतकरी देखील संकटात आला आहे.