ETV Bharat / state

वाशिममध्ये संततधार कायम; 3 मध्यम व 52 लघु, तर 55 प्रकल्प 100 टक्के भरले

जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील 136 पाणी प्रकल्पांपैकी सोनल आणि एकबुर्जी हे 3 मध्यम, तर इतर 52 लघु असे 55 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

जिल्ह्यात संततधार पाऊस
जिल्ह्यात संततधार पाऊस
author img

By

Published : Aug 19, 2020, 9:52 AM IST

वाशिम - जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर, जिल्ह्यातील 136 पाणी प्रकल्पांपैकी सोनल आणि एकबुर्जी हे 3 मध्यम, तर इतर 52 लघु असे 55 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर, अनेक ठिकाणी धरण परिसरातील शेतात धरणातून पाणी वाहिले. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे. तूर व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे.

वाशिम तालुक्यातील सर्वात मोठा लघु सिंचन प्रकल्प असलेला वारा जहागीर येथील संगमेश्वर प्रकल्प गत काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शंभर टक्के भरला आहे. त्याचा उमरा मोठा, वारा, देपुळ, बोरी काजलांबा, मसला, धानोरा, मापारी परिसरातील शेतकऱ्यांच्या धरणाच्या परिसरातील शेतात सुद्धा पाणी भरल्याने सोयाबीन व तूर पिकांना फटका बसला. मात्र, धरण भरल्याने परिसरातील शेतकरी राजाला रब्बी हंगामात निश्चितच फायदा होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.