ETV Bharat / state

विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल - होम क्वारंटाईन

राज्यभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे. वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांतही कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकांना होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करत आहे. जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

Curfew
संचारबंदी
author img

By

Published : Apr 29, 2020, 8:53 AM IST

वाशिम - विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ९५ वाहने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती वाशिम जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. यापुढेही कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होवू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करून विना परवानगी जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल

राज्यभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे. वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांतही कोरोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकांना होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करत आहे. जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘होम क्वारंटाईन’ आदेशाच्या उल्लंघन प्रकरणी ५ जणांवर कारवाई -

मुंबई, पुणे, इतर महानगरे आणि बाहेरच्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात यापूर्वी परतलेल्या नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारून त्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले होते. त्यानुसार ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील ५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात करण्यात आली आहे.

विना परवानगी जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची माहिती द्या - जिल्हाधिकारी

वाशिम जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. मात्र, यापुढील काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्ह्यात संचारबंदी, जिल्हाबंदी आणि ‘होम क्वारंटाईन’ विषयक आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच आपल्या नातेवाईकांना सुद्धा आहे त्या ठिकाणीच थांबण्यास सांगावे. संचारबंदी, जिल्हाबंदी व ‘होम क्वारंटाईन’चे आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींची माहिती नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून अथवा व्हॉटसअप संदेशाद्वारे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. ‘होम क्वारंटाईन’ आदेशाचे उल्लंघन करून शहर, गावामध्ये फिरणाऱ्या व्यक्तींना यापुढे संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात पाठवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.