ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकार विरोधात वाशिममध्ये भाजपा महिला मोर्चाचा 'आक्रोश' - वाशिम भाजपा महिला मोर्चा

महिलांवरील अत्याचारांच्या पार्श्वभुमीवर आज राज्यभरात भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या अतंर्गत वाशिमध्येही भाजप महिला मोर्चाने आंदोलन करत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली.

bjp women's front agitation at washim
महाविकास आघाडी सरकार विरोधात वाशिममध्ये भाजपा महिला मोर्चाचा 'आक्रोश'
author img

By

Published : Oct 12, 2020, 7:22 PM IST

वाशिम - राज्यात दिवसागणिक वाढत असलेले महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोप करत आज शहरात भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

राज्यभरात सध्याची स्थिती पाहता महिला अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. विनयभंग, बलात्कार या सारख्या घटना घडण्याचा आलेख ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली असुन हे अत्याचार कमी करण्यात सरकार कमी पडत आहे असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी केला. अशातच,आता राज्यात काही ठिकाणी तर चक्क कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या महिलांवरही अत्याचार झाल्याच्या घटना समोर येत आहे. या कोविड सेंटरमध्ये देखील महिला सुरक्षित नसून तेथे देखील त्यांच्यावर अत्याचार होत असल्याची बाब आंदोलनकर्त्या महिलांनी सरकराच्या निदर्शनात आणुन दिली. मात्र असे असताना, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत असताना देखील सत्तारूढ महाविकास आघाडीचे सरकारने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. याबाबत ते गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे. तर, मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत. तर गृहमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही. त्यामुळे महिलांवरीच गुन्ह्यांबाबत हे सरकार गंभीर नाही असा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी सरकार केला. यावेळी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने लवकरात लवकर ठोस पावले उचलुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.