ETV Bharat / state

वाशिम : खासगीकरणाचा निर्णय; बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन - bank employee news washim

दोन दिवसाचे देशव्यापी संप आहे. यासंदर्भात प्रमुख मागणी खासगीकरण करू नये अशी आहे. जवळपास 6 लाख कर्मचारी संपात सहभागी आहे. बँकांचे खासगीकरण हे जनहितविरोधी धोरण आहे. खासगीकरणामुळे जनतेच्या पैशाचे नुकसान होईल.

bank employee agitation in washim over bank privatisation decision
बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : Mar 15, 2021, 1:40 PM IST

Updated : Mar 15, 2021, 5:34 PM IST

वाशिम - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशातील बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. या बँक खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक पाटणी कमर्शियलमध्ये केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेली केंद्राच्या विरोधात 'बँक बचाव देश बचाव'च्या घोषणा देण्यात आल्या.

बँक कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया.

खासगीकरणाने जनतेच्या पैशाचे नुकसान -

दोन दिवसाचे देशव्यापी संप आहे. यासंदर्भात प्रमुख मागणी खासगीकरण करू नये अशी आहे. जवळपास 6 लाख कर्मचारी संपात सहभागी आहे. बँकांचे खासगीकरण हे जनहितविरोधी धोरण आहे. खासगीकरणामुळे जनतेच्या पैशाचे नुकसान होईल. या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आम्ही संप करत असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी वाशिम शहरातील तसेच वाशिमजवळच्या शाखांतुन ७० ते ८० बँक कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणासाठी प्रशासन सरसावले; मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा

Last Updated : Mar 15, 2021, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.