वाशिम - मालेगाव येथील अकोला फाट्यावर एका सर्व्हीसिंग सेंटरजवळ बंद पडलेल्या लक्झरी बसच्या खाली दोन दिवसाचे बाळ आढळले. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच नागपुरातील शिवसैनिकांचा जल्लोष
लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोकांनी याची माहिती मालेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या दोन दिवसाच्या बाळाला ताब्यात घेतले. त्यानंतर हे बाळ प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. बाळाची प्रकृती स्थिर आहे. हे दोन दिवसांचे अर्भक गाडी खाली कोणी आणून टाकले, याचा मालेगाव पोलीस शोध घेत आहेत.