वाशिम - शहरातील लाखाळा परिसरात राहणाऱ्या किशन देवाणी यांच्या घरात घुसुन 5 ते 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न ( Attempt Robbery In Washim ) केला. मात्र, देवाणी यांच्या घरात दुधवाला आणि शेजारील आल्यामुळे दरोडेखोरांनी पळ काढला. त्यामुळे दरोडेखोरांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.
लाखाळा परिसरातील माधव नगर येथे ( Washim Lakhala Madhav Nagar ) व्यापारी किशन देवाणी हे राहतात. सायंकाळच्या सुमारास इंडिका विस्टा या कारमधून धारधार शस्त्रासह आलेल्या 5 ते 6 अज्ञात दरोडेखोरांनी किशन देवाणी यांच्या घरात प्रवेश केला. तेव्हा घरात तीन महिला होत्या. त्यांना धारधार शस्त्रांचा एका जागी बसवले आणि कपाट तोडण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी देवाणी यांच्या घरात त्यांचे शेजारी आणि दुधवाला आल्याचे समजताच दरोडेखोरांचा प्रयत्न फसला, आणि विना नंबर प्लेट कारमधून पळून गेले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक एस.एम. जाधव, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रफीक शेख घटनास्थळी दाखल झाले. पोलीस श्वान पथक, सीसीटीव्हीच्या सहाय्याने अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा - Fire Breaks Out : नंदुरबारमध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान