वाशिम - कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत शेतजमीन विक्रीस उपलब्ध असूनही,पात्र लाभार्थ्यांना ती मिळत नाही. त्यामुळे रिसोड शहरातील लाभार्थी महिला व पुरुषांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमूदत उपोषण सुरू केले आहे. आज सातव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.
हेही वाचा - छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रिसोड शहरातील पात्र असलेल्या 13 महिला व पुरुषांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत शेतजमीन मिळण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्या मागण्यांची कोणतीही दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे या सर्व पात्र लाभार्थ्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हेही वाचा - मंदी येत नाही लादली जातेय अन ही अशांततेची सुरवात -प्रकाश आंबेडकर
जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.