ETV Bharat / state

विनापरवाना कोविड सेंटर चालवणाऱ्या नवजीवन हॉस्पिटलवर कारवाई - वाशिम नवजीवन रूग्णालय कोविड सेंटर बातमी

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. वाशिममध्ये विनापरवाना कोविड सेंटर चालवणाऱ्या एका रूग्णालयावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारवाई केली आहे.

Washim Navjeevan Hospital news
वाशिम नवजीवन रूग्णालय बातमी
author img

By

Published : Apr 13, 2021, 8:37 AM IST

वाशिम - जिल्ह्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण वाढत आहेत. अनेक खासगी डॉक्टर्स परवानगी नसतानाही कोविड सेंटर चालवत असल्याचे समोर येत आहे. वाशिम शहरातील नवजीवन हॉस्पिटलवर कोविड विनापरवाना कोविड सेंटर चालवल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी कारवाई केली. त्यांनी या हॉस्पिटलला परवाना रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस बजावली आहे.

वाशिममधील नवजीवन हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली

शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये विनापरवाना कोविड रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही त्या रूग्णालयाला भेट दिली असता, कोरोनाचे 20 रूग्ण आढळून आले. त्यामुळे रूग्णालयाचा परवाना रद्द करण्याचा इशारा देणारी नोटीस दिल्याची माहिती डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.

नवजीवन हॉस्पिटलमध्ये निमोनियाचे रूग्ण आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रूग्णालयाला भेट दिली आहे. आम्ही कोविड सेंटरची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पाठवली असल्याचे नवजीवन हॉस्पिटलमधील डॉ. अस्लम शेख यांनी सांगितले.

हेही वाचा - नालासोपाऱ्यात दोन रुग्णालयांमधील दहा रुग्ण दगावले; ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.