वाशिम - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. आजपासून विनामास्क फिरणाऱ्यांवर प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान, मंगरूळपीर नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हरवर विनामास्क प्रवास केल्याने त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसुल करण्यात आला.
नियमाचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई -
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे कठोर पावले उचण्यात येत आहे. आज मंगरूळपीर नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तसेच त्यांच्या वाहनचालक मास्क न लावता वाहन चालवत असल्याचे मंगरूळपीर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिसल्यावर त्यांनी त्यांची गाडी थांबवली व चालकावर कारवाई करत 500 रुपये दंड वसूल केला. नियमाचे उल्लंघन केल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते, हे निमित्ताने बघायला मिळाले.