वाशिम - वाशिम येथील १९ वर्षीय यश मारुती इंगोले या युवा गिर्यारोहकाची निवड आफ्रिका खंडातील ‘किलीमांजारो’ शिखरावर चढाई करण्यासाठी निवडलेल्या चमूमध्ये झाली आहे. आफ्रिका खंडातील किलीमांजारो (उंची : सुमारे ५८९२ मीटर) हे सर्वोच्च शिखर सर करण्यासाठी तो प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा - पावसामुळे दोन मजली इमारत कोसळली; कोणतीही जिवितहानी नाही
किलीमांजारो सर्वात उंच शिखरांपैकी एक
किलीमांजारो हा जगातील सर्वात उंच शिखरांपैकी चौथ्या नंबरचे शिखर आहे. हे शिखर जगातील एकमेव असे शिखर आहे, जे एकाट आहे. त्याच्या जवळपास लागून दुसरे कोणतेही शिखर नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनी, म्हणजे 15 ऑगस्ट रोजी किलीमांजारोच्या शिखरावर भारतीय तिरंगा फडकवण्याचा यशचा मानस आहे. या शिखरावर चढाई करताना तेथील तापमान 32 ते 35 डिग्री असेल तर शिखरावर तापमान उणे 29 डिग्री सेल्सिअस असेल.
वडिलांच्या ट्रेकिंगच्या आवडीतून मिळाली प्रेरणा
यशला त्याच्या वडिलांच्या ट्रेकिंगच्या आवडीतून गिर्यारोहणाची प्रेरणा मिळाली. त्याने आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील मनाली येथील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाइड स्पोर्ट्स या संस्थेतून गिर्यारोहणाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, प्रशिक्षणादरम्यान त्याने बालाचंद्र शिखरावर १५ हजार फुट यशस्वी चढाई केली असून अशा प्रकारची चढाई करणारा तो जिल्ह्यातील पहिलाच गिर्यारोहक आहे. तसेच, त्याने उत्तराखंडमधील बेदनी बुग्याल हा ट्रेक सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ४०० फुट उंचीच्या ‘कळसुबाई’ या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर त्याने दोन वेळा यशस्वी चढाई केली आहे. त्याचबरोबर, सह्याद्री पर्वतरांगामधील १८ किल्ले, तसेच ३ समुद्री किल्ल्यांवरसुद्धा चढाई केली आहे. ‘किलीमांजारो’ शिखरावर चढाई करण्यासाठी निवड झाल्याबद्दल यशचे अभिनंदन केले जात आहे.
हेही वाचा - सव्वा वर्षापासून बंद असलेली पूर्णा-अकोला-पूर्णा पॅसेंजर अखेर धावली