वाशिम- शहरातील हिंगोली मार्गावरील एका रुग्णालयाच्या बाजूला एक पुरुष जातीचे नवजात अर्भक बेवारस अवस्थेत आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याबाबत रुग्णालय परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बाळाला ताब्यात घेतले.
अकोला-हिंगोली मार्गावरील पुसद नाका परिसरात विविध खासगी रुग्णालये आहेत. दरम्यान, या परिसरात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अंदाजे एक दिवसाचे बाळ टाकून पोबारा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून नवजात बाळाला ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहे. मात्र हे बाळ कोण सोडून गेले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा- जून-जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान; आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा