वाशिम- जिल्ह्यात नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असतानाच एका मजूराचा मलब्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांदई येथे प्रवीण ठाकरे यांच्या नवीन विहिरीचे खोदकाम सुरू होते. विहिरीचे खोदकाम तीन मजूर करीत होते. गुरूवारी सांयकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे विहिरीत काम करणाऱ्या दोन मजुरांनी वर येऊन आपले प्राण वाचवले तर एका मजूराचा मलब्याखाली दबून मृत्यू झाला.
गुरूवारी (10 जून) प्रवीण ठाकरे यांच्या शेताशेजारी असलेल्या नाल्याला पूर आला. पूराचे पाणी विहिरीत गेले आणि विहीर पाण्याने पूर्ण भरली. त्यामुळे विहीर जमिनीत खचली. विहीर खचली हे लक्षात येताच दोन मजूरांनी वर येऊन आपले प्राण वाचवले. मात्र, काम करणाऱ्या मजुरांपैकी अनिल डोंगरे हा विहिरीत राहिला. तो वर येण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र, पाय घसरून खाली पडला. यामुळे तो पाण्याखालील मलब्यात दबला गेला व त्याचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी कालपासून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिर खूपच मोठी व कच्ची असल्याने पुन्हा खचण्याची दाट शक्यता होती. यामुळे कोणीही विहिरीत उतरणे शक्य होत नव्हते.
बाॅडी विहीरीतून वर आणण्यात यश -
यावेळी तहसीलदार कोंडागुरोले यांनी पिंजर येथील मानवसेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तत्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण बोलावले. तेव्हा लगेच सिन ट्रेस केला यावेळी विहिरीत दहा फूट पाणी होते. तसेच विहिरीत मोठ्या प्रमाणावर गाळ होता. त्यात ही विहीर कच्ची असल्याने खचण्याची दाट शक्यता होती. यावेळी जीवरक्षक दीपक सदाफळे हे प्रयत्न करुन विहिरीत उतरले व अंडर वाॅटर सर्चिंग चालू केले. तेव्हा त्यांचा उभ्या अवस्थेत गाळात फसलेल्या मृतदेहाच्या पायाला स्पर्श झाला. त्यांनी तळाशी जाऊन बाॅडी विहिरीतून वर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाॅडी गाळात फसलेली असल्यानेवर काढता आली नाही. वायररोप घेऊन ते तळाशी गेले व पायाला रोप बांधून विहिरीच्यावर आले व आपल्या सहकाऱ्यांना वर ओढायला सांगितले. तेव्हा अनिल डोंगरेचा मृतदेह आज शुक्रवार रोजी दुपारी पाच वाजता पाण्यावर आणला गेला. क्रेनच्या साहाय्याने त्याला बाहेर काढले. यावेळी मंगरूळपीरचे ठाणेदार जगदाळे व इतर पोलीस कर्मचारी हजर होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
हेही वाचा- विरारमध्ये बाथरूमधील पाण्याच्या टबमध्ये बुडून 18 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू