वाशिम - पेनटाकळी प्रकल्पात 97 टक्के जलसाठा झाल्याने धरणाचे 9 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीपात्रात 6720 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. या विसर्गामुळे जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यामध्ये पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. तसेच गोभणी हा ग्रामीण मार्ग सकाळपासून बंद करण्यात आला आहे.
प्रशासनातर्फे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांमधील लोकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीपात्रात जाऊ नये, तसेच जनावरेही नदीपात्रात सोडू नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.