वाशिम - आज दुपारी चार वाजताच्या सुमारास मालेगाव पोलिसांनी 32 किलो गांजासह चार आरोपींना अटक केली आहे. योगेश पाणभरे (20), रेखा कालापाड (30), संगीता पाईकराव आणि नाशिर (23) अशी आरोपींची नावे आहेत. जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 3 लाख 50 हजार इतकी आहे.
मालेगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मालेगावात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मालेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनूने यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. वाशिम येथील अकोला फाट्यावरून बुलढाणा येथे गांजा घेऊन जात असताना पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.