वाशिम - जिल्ह्यात 30 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून एकूण बाधितांचा आकडा आता पाचशेच्या वर गेला आहे. चार जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.
प्राप्त अहवालापैकी रिसोड तालुक्यात 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये रिसोड शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील 1, पठाणपुरा परिसरातील 1, गोरखवाडी येथील 1आणि मांगवाडी येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. आज प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गंगू प्लॉट परिसरातील 2, सोफी नगर परिसरातील 2, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील 1, मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील 5, कारंजा लाड शहरातील इंगोले प्लॉट परिसरातील 1 व पुंजाणी कॉम्प्लेक्स परिसरातील 1, मंगरुळपीर शहरातील सिद्धार्थ विद्यालय परिसरातील 1, मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव येथील 1, शेलुबाजार येथील 1, चिखली (झोलेबाबा) येथील 1 आणि बिटोडा भोयर येथील 2 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील 3 आणि वाशिम शहरातील स्त्री रुग्णालय परिसरातील 1 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, मंगरुळपीर शहरातील पठाणपुरा येथील 1, कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील 1 आणि शिवनगर येथील 1, ब्राह्मणवाडा (ता. वाशिम) येथील 1, अशा एकूण चार व्यक्तींना उपचारानंतर आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण करून आबादी त्यांची संख्या 518 वर पोहोचली सध्या 229 सक्रिय (अॅक्टीव्ह) रुग्णांवर जिल्हा सामान्य सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.