वाशिम - जिल्ह्यामध्ये आणखी २१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे २६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २६ जुलैला कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील बेलदारपुरा येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून काम करण्याचे अवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २१ व्यक्तींना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील फकीरपुरा येथील १, इलखी (ता. वाशिम) येथील २, मंगरूळपीर शहरातील काझीपुरा येथील ४, पठाणपुरा येथील २, टेकडीपुरा येथील ३, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील ३, गजानन महाराज मंदिर परिसरातील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील १, साईनगर परिसरातील २ व अशोक नगर परिसरातील १ व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यामध्ये 26 व्यक्तींना कोरोनाची लागणा झाली आहे. यामध्ये कारंजा लाड शहरातील रंगाडीपुरा परिसरातील ३, अशोक नगर परिसरातील १, मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथील २, तऱ्हाळा येथील १ ,रिसोड शहरातील पठाणपुरा येथील २, आसनगल्ली येथील १२ आणि मांगवाडी येथील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अकोला येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील मस्जिदपुरा परिसरातील एका महिलेला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती
राज्यात बुधवारी 9 हजार 211 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 4 लाख 651 अशी झाली आहे. बुधवारी नवीन 7 हजार 478 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2 लाख 39 हजार 755 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 46 हजार 129 सक्रिय रुग्ण आहेत.