ETV Bharat / state

वाशिम: जिल्ह्यात 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण... - वाशिम पोलीस बातमी

जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी 15 जुलैपासून लॉकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आहे. त्यासाठी नियमांचे नागरिकांनी पालन करावे यासाठी पोलीस कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. कारंजा शहरातील मोहिमेसाठी पोलीस कर्मचारी गेले असता वाहनांच्या तपासणी दरम्यान अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्याने 6 पोलीस कोरोनाबाधित झाले.

16-police-tested-positive-for-corona-virus-in-washim-district
16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...
author img

By

Published : Jul 21, 2020, 5:19 PM IST

वाशिम- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. मागील चार दिवसांत 16 पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या परिवारातील 2 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील पोलिसांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी आजपासून जिल्ह्यातील प्रत्येक चेक पोस्टवरील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष काळजी घेण्यासह काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी गेल्या तीन महिन्यापासून रस्त्यावर कोरोनाशी लढत आहे. अशातच कारंजा आणि मंगरुळपीर या ठिकाणी कार्यरत असलेल्या तब्बल 16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

16 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...
जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी 15 जुलैपासून लॉकडाऊनच्या नियमात बदल करण्यात आहे. त्यासाठी नियमांचे नागरिकांनी पालन करावे यासाठी पोलीस कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. कारंजा शहरातील मोहिमेसाठी पोलीस कर्मचारी गेले असता वाहनांच्या तपासणी दरम्यान अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्याने 6 पोलीस कोरोनाबाधित झाले.

कोरोनाची बाधा झालेल्या पोलिसांच्या संपर्कातील पोलिसांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यात आणखी 10 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाबाधित एकूण पोलिसांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. तर या पोलिसांच्या कुटुंबातील दोन सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्यातील विविध चेक पोस्ट आणि चौकात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी चौकशी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.