वाशिम - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यात आज (रविवारी) १२५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील तीन दिवसात कोरोना रुग्णांचे आकडे बघितले तर ३१६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
याठिकाणी आढळले कोरोनाबाधित -
शनिवारी रात्री उशिरा आणि आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, अकोला नाका परिसरातील १, महेश नगर येथील ४, इंगोले ले-आऊट परिसरातील ५, लाखाळा येथील २, शासकीय निवासस्थान परिसरातील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, उकळीपेन येथील १, मालेगाव शहरातील १, अमानी येथील १, किन्हीराजा येथील १, जऊळका येथील २, मेडशी येथील २, कुरळा येथील २, मंगरुळपीर शहरातील अशोक नगर येथील १, राजस्थान चौक परिसरातील ४, शहरातील इतर ठिकाणचा १, धरमवाडी येथील १, दाभा येथील ३, लोहगाव येथील १, कुंभी येथील १, चिंचखेडा येथील १, शहापूर येथील २, स्वासीन येथील १, नवीन सोनखास येथील १, मानोली येथील १, रिसोड शहरातील ४, कोयाळी येथील १, केनवड येथील ३, कवठा येथील ९, मसला येथील १, मांगुळ येथील १४, गोवर्धन येथील ३, मोप येथील ३, पेडगाव येथील १, देगाव येथील २, करेगाव येथील १, कारंजा शहरातील गुरु मंदिर परिसरातील ३, भारतीपुरा येथील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, काझी प्लॉट परिसरातील १, तेजस कॉलनी परिसरातील १, गुरु मंदिर रोड परिसरातील १, गवळीपुरा येथील १, नगरपरिषद जवळील २, सहारा कॉलनी परिसरातील २, पिंपळगाव गुंजाटे येथील १, धनज येथील ५, नागलवाडी येथील ५, निमसवाडा येथील १, पारवा येथील २, शिवनगर येथील १, येवता बंडी येथील १, धामणी येथील २, मेहा येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. तसेच ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय; सावधानता बाळगा - राज्यपाल
कोरोना बाधितांची सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह – ७७७३
अॅक्टिव्ह - ५०२
डिस्चार्ज – ७११४
मृत्यू – १५६
हेही वाचा - सर्वच सामाजिक कार्यक्रमांवर बंदी, लॉकडाऊन नको असल्यास नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन