ETV Bharat / state

आर्वीतील रुग्णालयामध्ये प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरवर हलगर्जीपणाचा आरोप

डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसुती नंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पती आणि नातलगांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. शनिवारी चार जणांच्या पॅनलच्या उपस्थितीत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.

Woman died after delivery rane hospital
रोहिणी डवरे मृत्यू राणे रुग्णालय
author img

By

Published : Sep 5, 2021, 8:22 PM IST

Updated : Sep 7, 2021, 2:48 PM IST

वर्धा - डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप पती आणि नातलगांनी केला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. शनिवारी चार जणांच्या पॅनलच्या उपस्थितीत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रोहिणी उर्फ गौरी अभिजित डवरे, असे मृत महिलेचे नाव आहे.

माहिती देताना रोहिणी यांचे पती अभिजित डवरे, पोलीस अधिकारी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मेघराज डोंगरे

हेही वाचा - हिंगणघाटमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण; चौघांना अटक

आर्वी येथे राणे मल्टीस्पेशालिटी खासगी रुग्णालय आहे. येथे बुधवारी (1 सप्टेंबर) रोजी रोहिणी डवरे हिला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी डॉ. कालिंदी राणे यांच्या देखरेखीखाली त्यांचावर उपचार सुरू होता. दरम्यान शुक्रवारी (3 सप्टेंबर) रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास प्रसुती झाली आणि एक गोंडस मुलगी जन्माला आली. पण, सिझेरियन नंतर रोहिणीच्या पोटात दुखत होते. तिला प्रचंड वेदना होत होत्या. यावेळी वारंवार डॉ. कालिंदी राणे यांना बोलवण्याच्या प्रयत्न केला. तेव्हा पोटात दुखत असते, इंजेक्शन दिले आहे, असे उत्तर देण्यात आले. डॉक्टरांना बोलावण्यात आले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. डॉ. कालिंदी राणे यांनी रोहिणीला पाहिले तेव्हा त्या घाबरून गेल्या असल्याचे पती अभिजित यांनी सांगितले.

डॉ. कालिंदी राणे यांनी इतर चार डॉक्टर बोलावून रोहिणीवर उपचार सुरू केला. पण, रक्तस्त्राव झाल्याने दुसरीकडून ब्लड आणण्यास सांगितले. पण, प्रयत्न थकले आणि रोहिणी डवरे हीचा तडफडत मृत्यू झाला, असा आरोप पती अभिजित डवरे यांनी केला. तिच्या मृत्यूला सर्वस्वी पत्नी रोहणीवर उपचार करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कालिंदी राणे जबाबदार असल्याचा आरोप अभिजित यांनी केला आहे.

चार जणांच्या पॅनलच्या देखरेखीत पार पडले शवविच्छेदन

या घटनेने शहरात खळबळ उडाली असून वातावरण तापले आहे. पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी याची चौकशी करण्याच्या अनुषंगाने शवविच्छेदन प्रक्रिया पारदर्शक असावी म्हणून, कुटुंबाच्या आरोपावरून चार लोकांच्या पॅनलच्या उपस्थितीत व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये शवविच्छेदन केले. यामध्ये महिला व बाल रोगतज्ज्ञ डॉ. वंदना वावरे, डॉ. उज्वल देवकाते, डॉ. अतुल गहुरकर, वर्धेचे डॉ. मुडे व नायब तहसीलदार विनायक मगर हे पॅनलचे सदस्य होते. या घटनेत डॉक्टरांवर आरोप असल्याने त्यांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.

रोहिणी यांची प्रकृती खालावल्यानंतर तिला ऑपरेशन कक्षात नेण्यात आले. याच दरम्यान लाईट गेल्याचा प्रकार घडल्याचेही कुटुंबीय सांगतात. जनरेटरसुद्ध बंद होते. अशा अवस्थेत मोबाईलच्या लाईटमध्ये डॉक्टरांनी उपचार केल्याचा आरोप अभिजित डवरे यांनी केला आहे. यामुळे मल्टिस्पेशालिटी रुग्णलायत रुग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जातो की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात चौकशीची मागणी

या घटनेत राणे रुग्णालय हे मल्टिस्पेशालिटी असल्याचा दावा करते. पण, त्या दर्जाची सेवा किंवा त्यासाठी लागणाऱ्या अटी शर्ती पूर्ण करत नाही. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. गरज पडल्यास त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मेघराज डोंगरे यांनी केली.

घटना दुर्दैवी रीतसर चौकशी व्हावी - नगराध्यक्ष सव्वालाखे

घटना नक्कीच दुर्दैवी आहे. कशामुळे घडले, हे अहवालातून स्पष्ट होऊन समोर येईलच. रीतसर चौकशी झाली पाहिजे. कोणताही डॉक्टर काही मुद्दाम करत नाही. काही गुंतागुंती झाली असेल, अडचणी आल्या असेल. यावेळी तिथे आलेले डॉ. कोल्हे यांच्यासह इतर डॉक्टरांनी प्रचंड प्रयत्न केले, पण निराशा झाली. पण, रीतसर चौकशी होणे गरजेचे आल्याचे नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे म्हणाले.

फोनला प्रतिसाद मिळाला नाही

या प्रकरणी राणे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक रिपल राणे यांची दूरध्वनीवरून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांची प्रतिक्रिया याबाबत कळू शकली नाही.

हेही वाचा - वर्धा : वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; नंदोरी परिसरातील घटना

Last Updated : Sep 7, 2021, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.