वर्धा - मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा तडाखा सुरू ( Widespread rain in Samudrapur ) होता. त्यामुळेच नदी नाल्याना पुर आला असून समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव, सावंगी, सायगव्हाण व लोखंडी या चार गावांना जोडणारा पोथरा नदीवरील पुलाचे सिमेंट काँक्रीट पुलाची वाताहत झाल्याने वाहतूक ठप्प झाली ( Road bridge washed away in wardha ) आहे. पहिल्याच पावसात पुलाचा वरचा थर पाण्याचा प्रवाहाने पुलाची दुरावस्था झाली. त्यामुळे गावाच्या दिशेने जाणाऱ्या चार गावांपर्यंत पोहोचण्यासाठी 30 किलोमीटरचा फेऱ्याने वाहतूक करावी लागत आहे. सध्या पुलावरून पावसाने विश्रांती घेतल्याने दुचाकीने वाहतूक सुरू झाली असली तरी मोठे वाहन जाण्यास अडचण आहे.
पावसाने पुल गेला वाहून - सतत सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. अनेक गावांमध्ये पूर आला आहे. समुद्रपूर तालुक्यातही पावसाने चांगलाच तडाखा बसला आहे. समुद्रपूर तालुक्याच्या वडगाव पिंपळगाव मार्गांवरील पोथरा नदीच्या पात्राला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याचे सिमेंट काँक्रीट वाहून गेले. यामुळे विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना ये जा करण्याकरिता हाच मार्ग असल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वाहतूक हळूहळू सुरू होत असली तरी पुलावरून मोठे वाहन जाऊ शकत नाही.
गावांचा सपर्क तुटला - या चारही गावाचा लोकांना सध्या 30 किलोमीटरचा फेरा करून पर्यायी मार्गाने जावे लागत आहे. हा पूल वाहून गेल्याने जरी आता वाहतुक खोळंबली असली तरी पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे एरवी पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी वाहू लागत असल्याने अनेकदा संपर्क तुटतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नेहमीच पावसाळ्यात होत असलेला त्रास निकाली काढावा अशीच मागणी ग्रामवासियांकडून होत आहे.
हेही वाचा - Video : चारचाकी कोसळली थेट दुधगंगा नदीत; चालकाला रेस्क्यू करून वाचवले