वर्धा - वर्ध्यातील डॉक्टरांनी एकत्र येत पर्यावरण आणि जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली. हातात कुदळ फावडे घेत 'जल ही जीवन है' नारा देत कामाला सुरुवात झाली. हळूहळू हे काम वर्ध्या सारख्या छोट्याशा जिल्ह्यातून सुरू झाले असले तरी आज अनेक राज्यात ते काम पोहचले. छतावर पडणारे पाणी जमिनीत सोडण्याच्या युनिटला पसंती मिळाली. याच कामाचे कौतुक आता केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी केले.
हेही वाचा - इस्त्रायली अग्निशमन तंत्रज्ञानाच्या खरेदीबाबत होणार करार
वर्ध्यात वैद्यकीय जनजागृती मंचाने वैदकीय क्षेत्रात काम न निवडता हातात कुदळ फावडे घेतले. पर्यावरण आणि पाणी याचे महत्त्व समजले. याची जाणीव करून देण्यासाठी गावो गावी जाऊन जनजागृती केली. हातात कुदळ फावडे घेत जमिनीवर चर खोदले. तर झाडे लावून जगवली. ऑक्सिजन पार्क तयार करत पर्यावरणाचा समतोल राखायला सुरुवात केली. पाणी फाउंडेशनला सोबत घेऊन जमिनीत पाणी मुरवण्याचे काम सुरू झाले. यावर काम सुरू असताना एक युनिट तयार झाले.
डॉ. सचिन पावडे यांनी विविध संकल्पना राबवत जलयोद्धा म्हणून कामात झोकून दिले. लहान मुलांवर उपचार करताना तहान भागवणाऱ्या जमिनीवर उपचार सुरू झाले. हजारो लाखो वर्षांपासून जमिनीच्या भूगर्भातील पाणी मोठ्या संख्येने बोअरच्या माध्यमातून उपसले जात आहे. दुसरीकडे पावसाचे पाणी नाल्यात वाहून जात आहे. मात्र, भूगर्भ रिकामा होत असताना त्यात पाणी सोडण्याची संकल्पना समोर आली. पावसाचे पाणी थेट जिथून काढतो तिथे सोडण्याची संकल्पना या युनिटच्या रुपात जन्माला आली.
घराच्या छतावर पडणारे पाणी थेट हजारो फूट खाली सोडून एका घराला पुरेल एवढे पाणी कुपनलीकेच्या साह्याने जमिनीत सोडायचे, असा हा प्रयोग आहे. याच युनिटला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मागणी होत आहे. यासह अनेक राज्यातून या युनिटला प्रतिसाद मिळत आहे. याचीच दखल खासदार रामदास तडस यांनी घेतली. या कामाची माहिती जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना दिली. डॉ सचिन पावडे यांच्याशी बैठक लावत कामाची माहिती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री यांनी कामाची माहिती ऐकून घेत कौतुक केले. शिवाय ट्विटर हँडलवर शेअर सुद्धा केली. यामुळे कामाची माहिती महाराष्ट्रापूर्ती न राहता सर्वदूर पोहचली.
डॉ. सचिन पावंडे यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना आनंद व्यक्त केला. काम करत असताना कौतुकाची थाप मिळाली की ऊर्जा मिळतेच, पण जबाबदारी सुद्धा वाढत असल्याचे सांगितले. पुढील काळात आणखी काम करत राहू. तेच शासकीय यंत्रणेने सहभाग लाभल्यास राज्यातील घरो घरी काम पोहचवण्यासाठी मदत होईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा - पुण्यातील स्कोडा फॉक्सवॅगनचा उत्पादन प्रकल्प एक महिना राहणार बंद