ETV Bharat / state

वर्धा : ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या तसं गावाचं पाणीही आटलं - tanker

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने वर्धा जिल्ह्यातील गावांची तहान भगवणारी धरणे कोरडी ठाक पडली आहेत तर, विहिरींनी तळ गाठला आहे. जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील ३० ते ४० गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येनगाव येथील नागरिकांना लगतच्या पिंपरी गावतील टँकर धारकांकडून ४० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

येनगावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
author img

By

Published : Jun 7, 2019, 9:31 PM IST

वर्धा - जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला असून पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ येनगाव येथील नागरिकांवर आली आहे. गावात ग्रामपंचयात निवडणूक लागली तेव्हा ग्रामस्थांना पाणी मिळाले. तेव्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या दोन्ही गटांनी पाणी वाटले. निवडणून येणाऱ्या गटाने विजयाचा उपकार म्हणून की काय महिनाभर पाणी दिले. नंतर ग्रामपंचायतचे पैसे संपल्याचे कारण देत पाणी वाटप बंद करण्यात आले.

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने जिल्ह्यातील गावांची तहान भगवणारी धरणे कोरडी ठाक पडली आहेत तर, विहिरींनी तळ गाठला आहे. वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील ३० ते ४० गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येनगाव येथील नागरिकांना लगतच्या पिंपरी गावतील टँकर धारकांकडून ४० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे. हीच अवस्था जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात नजरेस पडत आहे.

येनगाव येथील नागरिकांना लगतच्या पिंपरी गावतील टँकर धारकांकडून ४० रुपये ड्रमने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

येनगावची लोकसंख्या केवळ १२०० इतकी आहे. मात्र, येथील लोकांना पाणी देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. गावातील विहिरींनी तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरावे लागते. तसेच विहिरीत बराच वेळ बसून चार ते सहा हंडा पाणी भरावे लागते. गावातील अनेक वर्षांपासूनची कुपणलीका देखील आटली आहे. दोन तास थांबून कुठे दोन हंडा पाणी हापसले जात आहे.

तालुक्यातील पाणी टंचाई विषयी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी सांगितले की, ३० गावात पाणी टंचाई आहे. खासगी विहिरींचे अधिग्रहण केले आहे. लवकरच उपाययोजना म्हणून काही गावात टँकर दिले जातील. मात्र, जून महिना आला तरी शासकीय यंत्रणेकडून गावात पाण्याचा टँकर पोहचला नाही.

टँकरमुक्त महाराष्ट्र दाखवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून खटाटोप केला जात आहे. मात्र, तितका खटाटोप पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केल्याचे दिसत नाही. त्यामुळेच गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पण ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष करू नये म्हणजे झाले.

Intro:वर्धा दुष्काळ स्पेशल स्टोरी एडिटेड pkg

कृपया व्हिडिओमध्ये बाईटचे दिलेल्या क्रमाने नाव टाकावे.

1) बेबीताई दुपारे, ग्रामस्थ, येनगावं कारंजा,वर्धा
2) सरिता घागरे,ग्रामस्थ, येनगावं कारंजा,वर्धा
3) महादेव धोटे, ग्रामस्थ, येनगावं कारंजा,वर्धा
4)भागीरथी धोटे,ग्रामस्थ, येनगावं कारंजा,वर्धा
5) उमेश नंदगवळी, गट विकास अधिकारी कारंजा,वर्धा.

कारंजात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते दुष्काळी तेरावा महिना... शासनाचा दुर्लक्षित दुष्काळ

- विकतच्या पाण्यावर करावी लागतेय गुजराण
- पाण्यासाठी दिवसरात्र विहीर, कुपनकलिकेवर गर्दी
- मजुरी नसताना पाण्यासाठी पैसे कसे खर्च करायचे

वर्धा - पिण्याचे पाणी देण्याला धर्म समजले जाते. पण हे पाणीच विकत घेण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. वर्ध्या जिल्ह्यातील हे चित्र दुष्काळी परिस्थितीचे वास्तव बोलून दाखवत आहे. यंदा पावसाचे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी झाले. तहान भगवणारी धरणे कोरडी ठाक तर विहरींनी तळ गाठला. हे चित्र फक्त येनगावचे नसून हीच अवस्था जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात नजरेस पडत आहे.

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील 30 ते 40 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवस निघतानाही तेच पिण्यासह दिवसभर लागणाऱ्या पाण्याची सोय करण्यासाठी घरावर हंडे घेत घरा बाहेर पडावे लागत आहे. येनगांवाची केवळ 1200 लोकख्येच गाव आहे. मात्र येथील लोकांना पाणी देण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून पडत आहे.

गावात दोन कुंपणालीक सहा विहरी आहे. पण विहारींनी तळ गाठला. पिण्याच्या पाण्याची घशाला पडलेली कोरड जीव मुठीत घेऊन विहरित उतरवण्यास भाग पाडत आहे. यात काय तर दोन तीन झरे शिल्लक आहे. पण त्यामुळे विहरित तासोनतास बसून चार सहा गुंड पाणी भरावे लागते. एवढे असळव तरी यासाठी पहाटे पासून उठून पाणी भरण्यासाठी नंबर लावावा लागतो तो त्रास वेगळाच. गावात ही विहिर सोडता आणखी पाच विहरी आहे पण गाळ उपसला नसल्याने गढूळ पाणी निघत आहे. हे पाणी जनावरांसाठी वापरले जात आल्याचे कल्पना कपाटे असो सरिता ताकसांडे गावातील महिला हेच सांगतात.

मारोतराव धोटे यांचे वयाची सत्तरी गाठली, हातात काडी घेऊन कुंपणालिकेवर जातात. दुष्काळांन पाणी कुंपणालिकेचे पाणी उपसातत. पाहिल्यांदाच पाहिलेला हा दुष्काळाने त्यांचे कंबरच मोडण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षांपासूनची कुंपणलिका आटल्याने वयाप्रमाने वृद्ध झाली आहे. दोन तास थांबून कुठे दोन गुंड पाणी हापसल्या जात आहे. गावातील जल देवीचे मंदिर आहे. पण जलदेवीचे मंदिरातील विहायर सुद्धा यंदा आटली लोकांना स्वयंपाकासाठी विहरित टँकर टाकून देवीला स्वयंपाज करून नैवद्य दखवण्याची वेळ यंदा कारंजावासीयांवर आली असल्याच्या भागीरथी धोटे सांगतात.

गावात ग्रामपंचयात निवडणूक लागली तेव्हा पाणी मिळाले तेव्हा मतांचा जोगवा मागणाऱ्या दोन्ही गटांनी पाणी वाटले. पराजय होताच गट पाणी थांबले. निवडणून येणाऱ्या गटाने विजयाचा उपकार म्हणून की काय महिनाभर पाणी दिले. नंतर ग्रामपंच्यायातच पैसे सरले वावर विकू काय असे उत्तर देऊन निवडणूक किती महत्वाची आहे हे वास्तव बेबीताई दुपारे यांनी बोलून दाखवले.

येनगांव पंचायत समितीचे सभापती मंगेश खवशी यांचे आहे. पण सभापती असताना शासकीय यंत्रणेपर्यंत हे वास्तव पोहचवू शकले नाहीं किंवा एखादा टँकर दिला नाही. शासकीय योजनेतून एक थेंब पाणी जून महिना लागून मिळाले नाही. यामुळे लगतच्या पिपरी गावतील टँकर धारकांनी मेहरबानी केली. 40 रुपये ड्रमने पाणी विकत घेतात. ज्यांच्याकडे स्वतःची बैलबंडी आहे ते जाऊन आणतात. तर काही सायकल आणि दुचाकीला डबक्या बांधून पाणी गावात आणतात. पण यंदा ना मजुरी नसल्याने हाताला काम नाही आणि पैसेही नाही. त्यांच्या नशिबी मात्र दोन किलोमीटर जाऊन पायपीट करण्या शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही.

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश नंदागवळी सांगतात..30 गावात पाणी टंचाई आहे. खाजगी विहिरींचे अधिग्रहण केल्या आहेत. लवकरच उपाययोजना म्हणून काही गावात टँकर दिले जातील. पण जून लागला तरी गावात मात्र पाण्याचा टँकर शासकीय यंत्रणेकडून पोहचला नाही.

टँकरमुक्त महाराष्ट्र दाखवण्यासाठी जितका खटाटोप शासकीय यंत्रणेकडून केला जात आहे. तितका खटाटोप पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केला तर बरे झाले असते. गावकऱ्यांनाणी विकत घेण्याची वेळ आली नसती. पण ही वेळ पुन्हा येऊ नये यासाठी आताच उपाययोजना करणे काळाची गरज आहे. याला शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष करू नये म्हणजे झाले.
Body:पराग ढोबळे,वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.