वर्धा - जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध सीमेवर चेकपोस्ट तयार करण्यात आल्या आहेत. यात सेलू तालुक्यातील वानरविहिरा चेक पोस्टवर होंडासिटी वाहनाची तपासणी केली असता दारुसाठा सापडला आहे. ही कारवाई गुरुवारच्या पहाटे 3 वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी श्याम सोनटक्के याला आरोपीला अटक केले आहेत.
विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दारूसाठा जिल्ह्यात आणला जाणार असण्याची शक्यता आहे. यामुळे ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला आहे. तसेच वाहनाची कसोशीने चौकशी केली जात आहे. वानरविहिरा चेकपोस्टवर वाहन क्रमांक (एम एच 31 सी एन 8621) संशयावरून तपासणी करण्यात आली. यावेळी विदेशी दारू हस्तगत केली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांच्या आदेशाने सर्वत्र निवडणुकिच्या काळात दारुवाहतुकीवर जरब बसवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. यावेळी वाहनात असलेले श्याम नीलकंठ सोनटक्के याला अटक केली असून गाडीचा चालक मालक विशाल बादलमवारा हा संधी साधत जंगलाच्या दिशेने धावत जाऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे. यात सेलू पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगितले जात आहे.
ही कारवाई सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री ही कारवाई विजय पंचभाई, सुरेश चव्हाण यांच्या माहिती वरून जमादार मोतीलाल धवने यांच्या पथकाने राजेश पाचर, अमोल राऊत, जयेश डांगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन 1 लाख 13 हजाराचा विदेशी दारुसाठा आणि होंडा सिटी कारसह असा 3 लाख 13 हजार मुद्देमाल जप्त केला. सेलु पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.