Live Updates-
- 03.06 PM - रामदास तडस 62 हजार 973 मतांनी आघाडीवर
- 02.51 PM - रामदास तडस 55 हजार 848 मतांनी आघाडीवर
- 02.21 PM - रामदास तडस 50 हजार मतांनी आघाडीवर
- 01.22 PM - रामदास तडस 38 हजार मतांनी आघाडीवर
- 01.04 PM - रामदास तडस 24 हजार मतांनी आघाडीवर
- 11.43 AM - रामदास तडस - 54363, चारुलता टोकस - 41043
- 10.21 AM - रामदास तडस -23015, चारुलता टोकस - 15199
- 08.43 AM - रामदास तडस आघाडीवर
- 08.30 AM - रामदास तडस यांनी घेतले हनुमानाचे दर्शन
- 08.00 AM - मतमोजणीला सुरुवात
वर्धा - वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रामदास तडस यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात भाजपकडून रामदास तडस तर काँग्रेसच्या चारुलता टोकस यांच्याच मुख्य लढत होती. तसेच राज्यात बहुतेक ठिकाणी तिहेरी लढत निर्माण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांच्यामुळेही निवडणुकीला रंगत आली होती. आता या तिहेरी लढतीत विजयाचा गुलाल तडस यांनी उधळला आहे. यासाठी शहरातील एफसीआय गोडाऊन, बरबादी रोड येथे मतमोजणी पार पडली. या मतदारसंघात यावेळी एकूण 61.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सहज उपलब्ध होणारे खासदार म्हणून रामदास तडसांच्या पाठिशी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम ताकद होती. तर पंतप्रधान मोदींनी देखील तडस यांच्यासाठी सभा घेऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. तडस हे विदर्भ केसरी राहिलेले पहिलवान आहेत. भाजपने यापूर्वी वर्ध्यामध्ये 3 वेळा विजय मिळवला आहे.
गांधी घराण्याशी चांगले संबंध असणाऱ्या काँग्रेस उमेदवार चारुलता राव टोकस यांनी मागील 2 वर्षात जिल्ह्यातील भागात संपर्क करून पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, छत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या टोकसांना काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर मात करत ही निवडणूक लढवावी लागली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबीयानं भाजपमध्ये प्रवेश केला होता.