ETV Bharat / state

वर्ध्यात पक्षी सप्ताह बहरला; पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग - पक्षी सप्ताह

बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला आहे.

पक्षी सप्ताह
author img

By

Published : Nov 14, 2019, 6:22 AM IST

वर्धा - बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला आहे. निसर्ग आणि पक्षी याचे महत्त्व या सप्ताहात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिनी वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्कमधून सप्ताहाची सुरवात करण्यात आली. तर जेष्ठ पक्षीतज्ज्ञ यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम येथील आनंदनिकेतन येथे समारोप करण्यात आला.

पक्षी सप्ताह बहरला, पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग

सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमात चितमपल्ली यांच्या उपस्थितीत भारतीय नीलपंख या वर्धा 'शहरपक्ष्याच्या' फलकाचे अनावरण करण्यात आले. लोकांच्या पसंतीतून मतदान घेऊन निलपंख या शहर पक्षाची निवड करण्याचे काम बहार नेचर फाऊंडेशनने केले. विविध उपक्रम राबवत पक्षी आणि नागरिकांना जोडण्याचा पर्यंत सतत केला जात आहे. यासह चारोळीवृक्षाचे रोपण तसेच पक्ष्यांवरील घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पक्षी सप्ताहाचा समारोप सेवाग्राम आश्रम परिसरातील तलाव व शेतशिवारात पक्षिनिरीक्षणाने करण्यात आला. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षण व पर्यावरण संरक्षण उपक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राबविलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदीही करण्यात आल्या. यावेळी, पक्षीअभ्यासक राहुल वकारे यांनी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांची ओळख पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे करून दिली. तर दीपक गुढेकर यांनी या सप्ताहात केलेल्या सुमारे ३५ प्रकारचे पाणपक्षी व अन्य पक्ष्यांच्या निरीक्षणातील नोंदींची सचित्र माहिती दिली. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. सालिम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच पक्षिनिरीक्षणातील आपले अनुभवकथनही पक्षीमित्रांनी केले.

आठवडाभर चाललेल्या उपक्रमात दररोज सकाळी पर्यावरणप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण व परिसर अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. वनौषधी उद्यानात विविध प्रकारच्या वृक्षवल्लींची ओळख पक्षिमित्रांनी करून घेतली. तर वागधरा येथे पक्षीसंवर्धनाबाबत गावकऱ्यांशी संवादही साधला.

Intro:mh_war_pakshimitra_sammelan_vis_7204321

पक्ष्याच्या माहीतीने बहारचा पक्षी सप्ताह बहरला.

- पक्षिनिरीक्षणात बालगोपालांचाही सहभाग

वर्धा - वर्ध्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला. निसर्ग आणि पक्षी याचे महत्त्व या सप्ताहात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिनी सप्ताहाला वर्ध्याच्या ऑक्सिजन पार्कमधून सुरू करण्यात आली असून जेष्ठ पक्षीतज्ज्ञ यांच्या जयंतीदिनी सेवाग्राम येथील आनंदनिकेतन येथे समारोप करण्यात आला.

या सप्ताहाचे उदघाटन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनी निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित कार्यक्रमात करण्यात आले होते. यामध्ये कार्यक्रमात चितमपल्ली यांच्या उपस्थितीत भारतीय नीलपंख या वर्धा 'शहरपक्ष्याच्या' फलकाचे अनावरण करण्यात आले. लोकांच्या पसंतीतून मतदान घेऊन निलपंख या शहर पक्षाची निवड करण्याचे काम बहार नेचर फाऊंडेशनने केले. विविध उपक्रम राबवत पक्षी आणि नागरिकांना जोडण्याचा पर्यंत सतत केला जात आहे. यासह चारोळीवृक्षाचे रोपण तसेच पक्ष्यांवरील घडीपत्रिकेचे प्रकाशन यानिमित्याने करण्यात आले.

या आठवड्यात आयोजित पक्षिसप्ताहाचा समारोप सेवाग्राम आश्रम परिसरातील तलाव व शेतशिवारात पक्षिनिरीक्षणाने करण्यात आला. या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षीनिरीक्षण व पर्यावरण संरक्षण उपक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत राबविलेल्या या उपक्रमात विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदीही करण्यात आली आहे.यावेळी, पक्षीअभ्यासक राहुल वकारे यांनी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या पक्ष्यांची ओळख पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे करून दिली. तर दीपक गुढेकर यांनी या सप्ताहात केलेल्या सुमारे ३५ प्रकारचे पाणपक्षी व अन्य पक्ष्यांच्या निरीक्षणातील नोंदींची सचित्र माहिती दिली. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. सालिम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच पक्षिनिरीक्षणातील आपले अनुभवकथनही यावेळी नवागत पक्षीमित्रांनी केले. पक्ष्यांवरील गीतही शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले

तर समारोप ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. सालिम अली यांचा जयंतिदिनी आयोजित समारोप कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सुषमा शर्मा होत्या. कार्यक्रमाला बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा हे उपस्थित होते.

या आठवडाभर चाललेल्या उपक्रमात दररोज सकाळी पर्यावरणप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांसाठी पक्षीनिरीक्षण व परिसर अभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते. यात आलोडी येथील शेतशिवार, वैकुंठधाम स्मशानभूमी परिसर, सालोड येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे वनौषधी उद्यान, रोठा तलाव, वागदरा येथील तलाव व वनराई, पवनार सूरगाव मार्गावरील नागटेकडी अशा वैविध्यपूर्ण स्थानांवर पक्षिनिरीक्षण करण्यात आले. वनौषधी उद्यानात विविध प्रकारच्या वृक्षवल्लींची ओळख पक्षिमित्रांनी करून घेतली. तर वागधरा येथे पक्षीसंवर्धनाबाबत गावकऱ्यांशी संवादही साधला.

या सप्ताहात बहार नेचर फाउंडेशनचे किशोर वानखडे, दिलीप वीरखडे, संजय इंगळे तिगावकर, अतुल शर्मा, मुरलीधर बेलखोडे, डॉ. श्याम भुतडा, डॉ. बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, राहुल तेलरांधे, वैभव देशमुख, जयंत सबाने, पराग दांडगे, राहुल वकारे, अविनाश भोळे, जलील शेख, प्राजक्ता वीरखडे, डॉ. सुप्रिया गोमासे, राजदीप राठोड, सुरभी बिप्लव, पार्थ वीरखडे, गजानन बर्वे, आर्य भातकुलकर, दीपक साळवे, रत्नाकर अवचट, मोहन हांडे, संगीता इंगळे, डॉ. आरती प्रांजळे, पंकज घुशे, रावी वकारे, देवाशीष साळवे, गुंजन साळवे, राजस हांडे, सारिका मून, आसावरी ठाकूर, दिव्यानी ठाकूर, वेदांत वाठ, आर्यन नागपूरकर, ज्ञानेश मगर, रितेश उमाटे, ज्योती ठाकूर, महेश ठाकूर आदी पक्षिमित्र व निसर्गप्रेमींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.