ETV Bharat / state

Wardha Accident : समृद्धी महामार्गांवर ट्रकला कारची मागून धडक, दोन डॉक्टर मैत्रिणींसह एकाचा जागीच मृत्यू - Samriddhi highway accident

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गांवर ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली आहे. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडला आहे.

Wardha Accident
समृद्धी महामार्गांवर ट्रकला कारची मागून धडक
author img

By

Published : Apr 2, 2023, 9:40 AM IST

वर्धा : डॉक्टर ज्योती क्षीरसागर (राहणार- मालेगाव, जिल्हा -वाशीम ), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (राहणार - अमरावती ), भरत क्षीरसागर (राहणार- मालेगाव, जिल्हा -वाशीम ) अशी मृतकाची नाव आहे. जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे यांना या घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांसाह घटनास्थळी पोहचले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे.

तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे : समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून जबर धडक दिली आहे. या भीषण अपघातात मालेगाव येथून नागपूरला जात असलेल्या कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. फाल्गुनी सुरवाडे आणि ज्योती क्षीरसागर या दोघी मैत्रिणी डेंटिस्ट डॉक्टर आहेत. तयेच या दोघी अगदी जवळच्या मैत्रीणी आहे. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात ही घटना भयंकर घटना आहे. कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडला आहे.

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र कसे थांबणार : नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना ज्योती क्षीरसागर हिचे कारवरील नियंत्रण सुटले. समोरील ट्रकला भरधाव वेगात असलेल्या कारने मागून धडक मारली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेले अपघात ही एक चिंतेची बाब ठरलेली आहे. सातत्याने होत असलेल्या अपघातामध्ये थेट मृत्यू होत असल्याने आता या मार्गाची नागरिकांना भीती वाढू लागली की काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातात कित्येक जण मृत्युमुखी पडत आहेत. आता ही वर्धा जिल्ह्यातील घटना असून यामध्ये सुद्धा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील या अपघाताचे सत्र कसे थांबणार याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

हेही वाचा : Naxal Police Encounter in Gadchiroli: गडचिरोलीच्या जंगलात नक्षल-पोलीस चकमक; इनामी नक्षलवादी ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.