वर्धा - कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवसभर लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले होते. याच जनता कर्फ्यूला वर्धा शहरासह जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. वर्ध्यातील जनतेनेही या कर्फ्यूमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण वर्ध्यातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे. एखादे वाहन रस्त्यावर दिसले तर पोलीस त्यांना अडवून त्यांची विचारपूस करत आहेत. त्यातील अनेकांनी रुग्णालयातील त्यांच्या नातेवाईकांना डबे पोहोचवण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. यांव्यतिरिक्त रस्त्यांवर केवळ पोलीस, रुग्णसेवा देणारे डॉक्टर, परिचारीका यांसह माध्यम प्रतिनिधीच दिसत होते.
खासदार रामदास तडस यांच्या देवळी गावातील लोकांनीही चांगला प्रतिसाद देत घराबाहेर पडणे टाळले आहे.
हेही वाचा - Coronavirus : जमावबंदीचा आदेश धुडकावत भरवलेला बाजार प्रशासनाने केला बंद