ETV Bharat / state

वर्ध्यात काही भागात पावसाच्या सरी, उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा

एप्रिलमध्येच उन्हाने तापमानाचा चढता पारा गाठल्याने मे महिन्यापर्यंत तापमान उच्चांक गाठेल, अशी नागरिकांना चिंता  भेडसावत आहे.

वर्धा पाऊस
author img

By

Published : Apr 13, 2019, 6:42 AM IST

वर्धा - शहरात शुक्रवारी तापमानाचा पारा ४३.३ अंशावर गेल्यानंतर सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. अवकाळी पावसाच्या सरी आल्याने कडाक्याच्या उन्हाने त्रासलेल्या नागरिकांना दिलासा मिळला आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ४२ ते ४३ अंशाची सरासरी गाठली. वाढलेले हे तापमान लोकांचे जनजीवन विस्कळीत करणारे ठरत आहे. उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या काही भागात थोडासा गारवा निर्माण झाला. तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. शुक्रवारीसुद्धा दिवसभराच्या तापमानानंतर सायंकाळी वातावरणात बदल झाला. त्यानंतर पावसाच्या सरीचे आगमन झाले.

राज्यातील उष्माघाताचा पहिला बळी वर्ध्यात-
एप्रिलमध्येच उन्हाने तापमानाचा चढता पारा गाठल्याने मे महिन्यापर्यंत तापमान उच्चांक गाठेल, अशी नागरिकांना चिंता भेडसावत आहे. या वाढलेल्या तापमानामुळे उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी जिल्ह्यातील तरुण ठरला आहे. जिल्ह्यातील धामणगाव येथे त्याचा मृतदेह आढळून आला आहे. गुरुवारी पहिल्या टप्प्यात लोकसभेचे मतदान पार पडले. त्यादिवशी ४४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे

Intro:R_MH_12_APR_WARDHA_RAIN_VIS_1

वर्ध्यात काही भागात पावसाच्या सरी, कडाक्याचा उकाळ्यानंतर गारवा

वर्धा सध्या तापमानाने चांगलाच कहर केला आहे. गुरुवारी पहिल्या टप्प्यात लोकसभेचे मतदान पार पडले. त्यादिवशी 44 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. शुक्रवारी हेच तापमान 43.3 अंश नोंदवला गेले. सायंकाळनंतर अचानक वातावरणात बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आर्वी आणि वर्धा तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. या अवकाळी पावसाच्या सरींनी कडाक्याच्या गर्मी नंतर काही प्रमाणात का होईना वातावरणात गारवा मिळाला.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने 42 ते 43 अंशची सरासरी गाठली. वाढलेले हे तापमान लोकांचे जनजीवन विस्कळीत करणारे ठरत आहे. उन्हामुळे जीव लाहीलाही होत असताना या अवकाळी पावसाने काही भागात थोडासा गारवा निर्माण झाला. गुरुवारी सुद्धा काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. शुक्रवारी सुद्धा दिवसभराच्या तापमाना नंतर सायंकाळी वातावरणात बदल होत पावसाच्या सरीचा आगमन झाले.

यंदाचा तापमान सुरुवातीलाच 42 ते 43 अंशावर असल्याने मे महिन्यापर्यंत तापमान काय उच्चांक गाठणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वाढलेल्या तापमानामुळे महाराष्ट्रातला पहिला बळी वर्धा जिल्ह्यातील युवक ठरलाय. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे त्याचा मृतदेह आढळून आल्याने उष्माघाताने मृत्यू झाल्याचं पुढे येत आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.