वर्धा - केंद्रात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाचे काम झाले आहे. आज चारही बाजूंनी देशात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे झाले आहे. मात्र आज विरोधी पक्षकांडे नेत्याचा अभाव आहे. कुठलेच मुद्दे नाहीत. नीती आणि नैतिकतेचा अभाव आहे. काँग्रेस आजच्या घडीला हताश निराश आणि नेता नसलेला पक्ष झाला असल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी वर्ध्यात केला. ते वर्ध्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शिवाय भाजप सरकारच्या कामाचा आराखडा वाचला.
ते पुढे म्हणाले, फडणवीस सरकारच्या विरोधात बोलायला विरोधकांना मुद्दे सापडत नाहीत. मागील पाच वर्षांत सरकारच्या काळात जे विकासकामे झालीत. ते आघाडीच्या सरकारला मागील 50 वर्षांत जमले नाही. मागील काळात भ्रष्टाचाराला आळा घालणे, बिगघडलेली कायदा सुव्यवस्था दुरुस्त करण्याचे काम सरकारने केल्याचे केंद्रीय मंत्री यावेळी बोलून गेले.
हेही वाचा - पवारांच्या सभेला चोरीची 'पॉवर'; वीज वितरणाची कारवाई