ETV Bharat / state

सत्याग्रही घाटामध्ये वाळूने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; चालक-वाहकाचा जागीच मृत्यू

वाळू भरलेला ट्रक कन्हान येथून अमरावतीच्या दिशेने अकोला जात होता. मध्यरात्री तळेगावच्या अगोदर काही अंतरावर असलेल्या सत्याग्रही घाटामधून ट्रक चालला होता. मात्र, ट्रक उतारावर असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला असल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.

sand truck accident
सत्याग्रही घाटामध्ये वाळूने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; चालक-वाहकाचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Feb 23, 2020, 2:31 PM IST

वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावर तळेगाव दरम्यान सत्याग्रही घाटामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजन असल्याने, वाळू भरलेल्या ट्रकवरून चालकाचे नियंत्रण सुटले व अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, सकाळी उघडकीस आली आहे. यात चालक जब्बार शहा तकदीर शहा आणि जोडी शेख नहीम शेख गुलाब या दोघांचा ट्रकच्या वाळुखाली दबून मृत्यू झाला. सुदैवाने तिसरा अगोदरच उतरल्याने तो बचावला.

सत्याग्रही घाटामध्ये वाळूने भरलेल्या ट्रकचा भीषण अपघात; चालक-वाहकाचा जागीच मृत्यू

हेही वाचा - वर्ध्याच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

वाळू भरलेला ट्रक कन्हान येथून अमरावतीच्या दिशेने अकोला जात होता. मध्यरात्री तळेगावच्या अगोदर काही अंतरावर असलेला सत्याग्रही घाटामधून ट्रक चालला होता. मात्र, ट्रक उतारावर असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला असल्याचे प्राथमिक दिसून येत आहे. यात ट्रकच्या इंजिनाचा भाग हा एका दगडाला अडकला. त्यांनतर वाळू भरलेला लाकडी ढाचा वजनाने तुटून चेंदामेंदा झाला. पहाटे तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने रेती हटवत मृतदेह बाहेर काढले. यामध्ये तिघे जण असल्याची माहिती मिळाली. पण सुदैवाने शेख शोफियान नामक व्यक्ती कोंढळीत उतरल्याने तो बचावला. पण चालक जब्बार शाह आणि शेख नहीम हे दोघेही अकोला येथील असून त्यांचा आता मृत्यू झाला.

पोलिसांनी मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तळेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनात घटनेची नोंद करत पोलीस कर्मचारी संदीप महाकाळकर, मनोज असोले, वसंत मुंगले यांनी कारवाई केली. यासह तहसीलदार यांना सुद्धा माहिती दिली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी पंतप्रधान मोदींचं केलं कौतुक, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.