वर्धा - देवळी तालुक्यातील पुलगाव येथे विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी (दि. 19 ऑक्टोबर) दुपारी दुचाकीवरून येताना राम मंदिर परिसरात सापळा लावून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दोघांमकडून दोन गावठी पिस्तुलासह 11 जिवंत काडतुस आणि एक चाकू जप्त करण्यात आले आहे. हे दोघेही रेती व्यवस्याशी निगडित असल्याने बोलले जात आहे. गणेश रमेश येदबान (वय 43 वर्षे) आणि अविनाश गणेश खोडे (दोघे रा. पुलगाव, ता. देवळी) असे अशी दोघांची नावे आहेत.
![जप्त केलेले साहित्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-pustul-japt-pkg-7204321_19102020210330_1910f_1603121610_956.jpg)
हेही वाचा - आम्हाला मोकळा श्वास पाहिजे... चिमुकल्यांचे महालक्ष्मी कंपनीच्या गेटसमोर आंदोलन