ETV Bharat / state

वर्ध्यात रावण दहनाला आदिवासी समुदायाचा विरोध - रावण पूजा

विजयादशमीनिमित्त वर्ध्यात आयोजीत केलेल्या रावण दहन कार्यक्रमला आदिवासी समुदायाने विरोध केला. आदिवासी समुदाय रावणाला राजा मानून त्याची पूजा करतात. यामुळे आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला.

रावणाचा पुतळा
author img

By

Published : Oct 9, 2019, 3:33 AM IST

वर्धा - दसरा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध केल्याचे मानले जाते. विजयादशमीनिमित्त वर्ध्यात आयोजीत केलेल्या रावण दहन कार्यक्रमला आदिवासी समुदायाने विरोध केला.

विजयादशमीनिमित्त वर्ध्यात आयोजीत केलेल्या रावण दहन कार्यक्रमला आदिवासी समुदायाने विरोध केला

आदिवासी समुदाय रावणाला राजा मानून त्याची पूजा करतात. यामुळे आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केला. वर्ध्यात गर्जना संघटनेच्यावतीने रावण दहनाचा कार्यक्रम आयोजीत केला होता. यासाठी पोलिसांची परवानगी देखील घेण्यात आली होती. कार्यक्रमावेळी आदिवासी समुदायाचे काही लोक हे गर्जना चौकात पोहचले.

हेही वाचा - व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार'

आदिवासी बांधवांनी रावण दहनाला विरोध केल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली. पोलीस बंदोबस्तात रावण दहनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जलक यांचासह पोलिसांचे एक पथक तैनात करण्यात आले होते.

Intro:mh_war_ravan_dahan_vis1_7204321

वर्ध्यात रावण दहनाला विरोध, पोलिसांनी काढली समजूत

- आदिवासी बांधवांनी केला होता विरोध
- रावण हा राजा असून त्याची पूजा करतात

वर्धा - आजचा दिवस देशभरात उत्साहात दसरा हा सण साजरा केला जातो. आजच्या दिवस प्रभू राम यांनी रावणाचा वध केल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेख आढळतो. हा दिवस अन्यायावर न्यायाचा विजय याच प्रतीक म्हणून सुद्धा साजरा करतात. यानिमित्याने रावण दहन केल्या जाते. वर्ध्यातील भगतसिंग मैदानावर असलेल्या या कार्यक्रमला आदिवासी समुदाय यांनी विरोध केला. यात पोलिसनाच्या मध्यस्थी करत समजूत काढत प्रकरण शांत केले.

आज देशभरात रावण दहन करून विजय दिवस साजरा केला जातो. तेच आदिवासी समुदाय रावण हा त्यांचा समूयदायाचा राजा होता असे मानतात. आजच्या दिवशी रावण हा राजा असून त्याची पूजा करता. यामुळे रावण दहनाला विरोध करतात. वर्ध्यात गर्जना सनघटनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळा आतिषबाजी करून रावण दहणाचा कार्यक्रम केला जातो. यासाठी रितसर परवानगी सुद्धा घेण्यात आली होती.

पण एन वेळी आदिवासी समुदायाचा काही लोक हे गर्जना चौकात पोहचून या दहनाला विरोध केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत प्रकरण समजून घेतले. यावेळी दहनाची रीतसर परवानगी घेतल्याने कार्यक्रम थांबवत येणार नाही. यासाठी मध्यस्थी करून आदिवासी बांधवांना विषय समजावून सांगत प्रकरणाला शांत केले. अखेर पोलीस बंदोबस्तात रावण दहन हा कार्यक्रम भगतसिंग मैदानावर पार पडला.

यावेळी घटनास्थळी एसडीपीओ पियुष जगताप, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जलक, यांचासश पोलीसाचे कुमक तैनात करण्यात आले होते.
Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.