वर्धा: विवाहितेचा विवस्त्र व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करीत नराधमाने तीच्यावर बळजबरीने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायकल प्रकार समोर आला आहे. सातत्याने होणाऱ्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पिडितेने अखेर याबाबतची तक्रार अमरावती पोलिसात दिली. घटनास्थळ वर्धा येथिल रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने अमरावती पोलिसांनी संबंधित तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये या प्रकरणात आता रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विवाहिता ही वर्धा येथे तिच्या मैत्रिणीच्या आजीला भेटण्यासाठी आली होती. तेव्हा ती स्वयंपकखोलीत जाऊन कपडे बदलवित असतानाच आरोपीने पीडितेचा विवस्त्र व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करु लागला. पीडितेने नकार दिला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेशी वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडितेच्या पतीला मारुन टाकेन अशीही धमकी दिली.
अखेर पीडितेने सततच्या त्रासाला कंटाळून अमरावती येथील पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.घटनास्थळ रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तीची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली. पाेलिस अधीक्षक कार्यालयातून ती तक्रार रामनगर पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलिसांनी आरोपी राकेश आडे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिलांना भुलवुन किंवा त्यांच्या न कळत त्यांचे व्हिडीओ आणि फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करत किंवा धमकावत त्यांचा गैर फायदा घेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी फोन वर मैत्री करून अश्लील चाळे करत त्याचा व्हिडिओ तयार करुन त्यांना नंतर ब्लॅकमेल करण्याचेही अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. कायदा पोलीस महिलांच्या बाजुने आहेत तरीही या स्वरुपाच्या घटना कमी होताना दिसत नाहीत.
अगदी ग्रामिण भागातही अलीकडे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहेत. अशा घटनेत मिळालेल्या धमक्यांनंतर निर्माण झालेल्या भीती मुळे किंवा समाजात होणारी बदनामी नको यासाठी महिला अशा प्रकाराला बळी पडतात. अनेकदा शारिरीक आणि आर्थीक फटका त्यांना बसतो. त्यांच्या याच मानसिकतेचा फायदा असे लोक घेत असतात. आणि त्यांची मागणी वाढतच जाते यातुन महिलांना आधिकच त्रास होतो.
अशा घटना टाळण्यासाठी महिलांनी आधिच सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे. पोलीस यंत्रणा त्यांचे वरीष्ठ आणि कायदे महिलांच्या बाजुचे आणि त्यांच्यावरील अन्याय रोकण्यासाठी समर्थ आहेत. अशा प्रकारात कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर महिला मुलींनी वेळीच कायदेशीर पाऊल उचलुन अशा प्रवृत्तीला वेळीच रोकले तर पुढचा अनर्थ टळू शकतो.
हेही वाचा : Pune Crime News : पर पुरुषासोबच दारु पिणे महिलेला चांगलेच भोवले, मुलाचे अपहरण झाल्यावर उतरली दारुची झिंग...