वर्धा - जामखुटा तालुक्यातील आर्वी येथे तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती 11 मे रोजी नवी मुंबईवरून आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. आता या तिघांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच अन्य दोघांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
यातील एका महिलेचा मृत्यू झालाय. मृत्यू झाल्यानंतर या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, वाशीम येथील एकावर उपचार अद्याप उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधितांंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याचे कार्य सुरू असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आलाय.