वर्धा - कोरोनाच्या काळात सीमाबंदीसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव थोडक्यात वाचला. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर कापसी येथील पोलीस कर्मचार्यावर तिघांनी वाहन चढवले. ही घटना बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अविनाश काळे, अतुल काळे आणि एक महिला अशा तिघांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर कापसी येथे नाकाबंदी करण्यात आली. जिल्ह्याची सीमाबंदी असल्याने वाहन अडवत पास विचारले. यात 8 ऑगस्टला एक वाहन चालक महिला घेऊन जिल्ह्यात विना पास येण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना पास नसल्याने परत पाठवले. यावेळी पाहून घेईल अशी धमकी देऊन परत गेला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
काल बुधवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार पुन्हा घडला. यावेळी (MH 32 AJ 2101) हे वाहन यवतमाळ जिल्ह्यातून वर्ध्याकडे येत होते. यावेळी नाकाबंदी दरम्यान कापसी येथे पोलीस कर्मचारी सत्यप्रकाश काकण हे कर्तव्य बजावत होते. वाहनातील तिघांकडे ईपास नव्हते. वाहन दिसताच अडवण्यासाठी गेले असताना चक्क अंगावर गाडी चढवण्यात आली. यावेळी कर्तव्यवर इतर कर्मचारी मदतीला धावले. यावेळी वाहन अडवण्यासाठी ठेवण्यात आलेले बॅरिकेटमुळे इतर कर्मचाऱ्यानी वाहन थांबवले. गाडीला थांबवत तिघांना खाली उतरवण्यात आले. यात दोन पुरुष आणि एक महिला होती. यावेळी महिलेस समोर करून शिवीगाळ करत असल्याने तसेच चौकीवर पोलीस नसल्याने गाडीचा नंबर घेऊन वाहन जाऊ देण्यात आले. घटनेची माहिती अल्लीपूर पोलीस स्टेशनला देण्यात आली.
यावेळी हे वाहन डवलापूर गावाकडे गेले. इथेही या तिघांनी गावात जाऊन गावकऱ्याशी कुठल्या तरी कारणाने वाद घातला. यावेळी गावकऱ्यांनी अल्लीपूूर पोलिसात तक्रार दिली. यावेळी अल्लीपूर पोलीस अगोदरच शोधात असताना त्यांनी तत्काळ गावात जाऊन तिघांना अटक केली. अल्लीपूर पोलिसात तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि पोलीस कर्मचाऱ्यावर वाहन चढवत जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक स्वपनील भोजगुडे यांनी ईटीव्ही भारताला दिली.
ईपास मागितले म्हणून पोलिसावर चढवले चारचाकी वाहन, महिलेसह तिघांना अटक - wardha corona update news
जिल्ह्याची सीमाबंदी असल्याने वाहन अडवत पास विचारले जाते. यात 8 ऑगस्टला एक वाहनचालक महिला घेऊन जिल्ह्यात विना पास येण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना पास नसल्याने परत पाठवले. यावेळी पाहून घेईल, अशी धमकी देऊन परत गेला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.