वर्धा - दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा नवरात्र उत्सव यंदा कोरोनाच्या संकटाने साधेपणाने साजरा होणार आहे. ज्या बाजरात नवरात्र उत्सवात पाय ठेवलाही जागा नसायची ती ठिकाणे सध्या कोरोनामुळे रीकामी आहेत. अनलॉक फेज असताना सुद्धा बाजारात मंदीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुकानातील वस्तूला पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक नसल्याने छोटे असो की मोठे व्यवसायिक यांचे व्यवव्हार हे अर्ध्यावर येऊन ठेपले आहे. या काळात देवीच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी असते, पण दुकानात वस्तू भरून असताना सुद्धा ग्राहकांनी मात्र पाठ फिरवली असल्याचे व्यापारी वर्ग सांगत आहे.
बाजारातील परिस्थितीचा आढावा घेताना प्रतिनिधी व्यापाराचे नियोजनही कोलमडलेसण-उत्सव कुठलाही असो व्यापारी वर्गाचे नियोजन हे साधारण पाच ते सहा महिन्यापूर्वी झालेले असते. कारण मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या वस्तू, नव नव डिझाईन, लोकांची मागणी आणि नवीन ट्रेंड या सगळ्याच्या विचार अगोदर केला जातो. पण कुठेतरी लॉकडाऊनमुळे या नियोजनावर फटका बसला आहे. शासकीय नियमावलीनुसार साध्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करताना उत्साह तसाही मंदावलेला आहे. कोरोनाच्या काळात गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने केले जाते. बाजारपेठेत याचा अवलंब करताना व्यापारी आणि ग्राहक हे दोघेही पालन करताना दिसून येत आहे. बाजारातील व्यवहारावर परिणाम मात्र झालेला आहे.
छोटे व्यवसायीकही अडचणीत.कोरोनाचा प्रभाव हा मोठ्या दुकानदारांवर झाला आहे, तसाच छोट्या दुकानदारांवर देखील झाला आहे. हात गाडी, रस्त्याच्याकडेला विकल्या जाणाऱ्या वस्तूच्या दुकानावरही परिणाम झालेला आहे. बाजारात स्पर्धा असताना सध्या या दुकानदारांकडे सुद्धा ग्राहक नसल्याने हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेले व्यवसाय सुरू झाले असले, तरी रोजी रोटीचा प्रश्न अजून सुटलेला नाही.
बाजारात विकल्या जाणाऱ्या वस्तू तशाच पडून नवरात्र उत्सवासाठी देवीच्या सजावटी साठी चुनरी, हार, प्लास्टिक फुले, देवीच्या हातात दिसणारे शस्त्र, देवीची हिरवा चुडा, बांगड्या, रांगोळी, देवीचे साहित्य, ओटीचे साहित्य, हळद कुंकू, यासह पूजेसाठी आणि मंडप असो की देवीच्या अंगावरील आभूषण यासाठी लागणारे साहित्याची बाजारात रेलचेल असते. पण सध्या दुकानात एखाद दोन ग्राहक आहे. काही ठिकाणी काउंटर खाली सुद्धा पाहायला मिळत आहे.