वर्धा - कोरोनाच्या संकटातून सावरत असताना पुन्हा रुग्ण संख्या वाढ होत असल्याने कोरोना रुग्णसंख्या नियंत्रीत करण्यासाठी प्रशासनाने इतर उपाययोजनांसोबतच जिल्ह्याच्या शहर आणि ग्रामीण भागात ३६ तासांची संचारबंदीची घोषणा केली आहे. प्रशासनाने यापूर्वीच हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, लग्न सभारंभ यावर नियमावाली जाहीर केली होती. तसेच महाविद्यालय बंदचे आदेशही जाहीर केले होते.
काय राहणार बंद -
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लक्षणे असलेल्या व्यक्तींचे विलगीकरण तसेच चाचणीला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवारी रात्री 8 ते सोमवार सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालवधीत अनावश्यक फिरणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत विनाकारण फिरताना आढळल्यास कारवाईचा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, चहा, नास्ता प्रतिष्ठाने, पानटपरी आणि इतर वस्तूंची विक्री बंद राहणार आहे. हॉटेल्स, रेस्टॉरेंट, एसटी, खासगी बस, ऑटोरिक्षा, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृहे, वाचनालये, आठवडी बाजार, गुरांचे बाजार, वाहन दुरूस्ती गॅरेज, बांधकामे, कटींगची दुकाने, सलू, ब्यूटी पार्लर, भाजीपाला, फळयार्ड, पर्यटनस्थळे, ऐतिहासीक स्थळे, राष्ट्रीयकृत बँक आर्थिक बाबीशी संबंधित सर्व वित्तीय संस्था, क्रीडा संस्था, प्रशिक्षण केंद्र, खेळ, पेट्रोल, डिझेल पंप बंद असणार आहे.
दवाखाने मेडिकल राहणार सुरू -
संचारबंदीच्या काळात आपातकालीन परिस्थतीत रुग्णांना सेवा मिळावी, यासाठी जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक करणारे ट्रक, मोटार, रिक्षांची सेवा यातून वगळण्यात आली आहे. दही दुध, डेअरी भाजीपाला विक्रीसेवा केंद्र सुरू राहणार आहे.