वर्धा - हिंगणघाट येथील वणा नदीच्या कवडघाट परिसरात चौघे पाण्यात बुडाले होते. सोमवारी हरतालिकेच्या गौरी विसर्जनाकरिता आले असता घटना घडली होती. मागील चार दिवसांपासून बेपत्ता मृतदेह शोधण्याची मोहीम सुरू आहे. आज (गुरूवारी) चौथ्या दिवशी यातील एका महिलेचा तिसरा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यातील तुराणा घाटाच्या काठावर काही जणांना आढळून आला. दीपाली भटे असे मृत महिलेचे नाव आहे. घटना स्थळापासून 75 किमी अंतरावर हा मृतदेह मिळाला आहे. तर अजूनही एसडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून अडचणींचा सामना करत 13 वर्षीय अंजनाचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - वर्धा : उत्तम स्टील वसाहतीत महिलेची आत्महत्या, दोन चिमुकल्यांचेही आढळले मृतदेह
तर चौथा मृतदेह हा रिया भगत यांच्या 13 वर्षीय मुलीचा आहे. यात तिची आई आणि भाऊ या दोघांचे मृतदेह सापडले आहे. एसडीआरएफचे दोन पथकांच्या साह्याने ही शोध मोहीम सुरू आहे. नदीला पूर असल्याने पाणी गढूळ झाले आहे. यामुळे मृतदेह शोधण्यास अडचण निर्माण होत आहे. मात्र, शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे एसडीआरएफ नागपूरचे असिस्टंट कमांडन्ट सुरेश कराळे यांनी दिली.
घरी हरितालिका पूजन केल्यानंतर शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदीकाठावर गौरी विसर्जनासाठी गेल्या होत्या. यामध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला होता. तर दोन मृतदेह बेपत्ता असल्याने दोन दिवसानंतर शेजारी राहणाऱ्या दिपाली भटे हीचा मृतदेह गुरुवारी तब्बल 70 किमी अंतरावर चंद्रपूर जिल्ह्यातील तुराणा घाटावर काही जणांना दिसला. यानंतर घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. तर मृतदेहाला दुर्गंधी पसरल्याने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती; राजकीय नेतृत्वासाठी पडताळणी सुरू
मृतदेह पाण्याच्या प्रवाह जास्त असल्याने बऱ्याच लांब निघून गेले आहे. तसेच पाऊसही सुरू असल्याने मोहीम राबवण्यास अडचण आहे. लवकर अंजनाचा शोध लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.