वर्धा: महाविद्यालयीन तरुणांसोबत आता कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलां - मुलींमध्ये सुद्धा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड तसेच समाजमाध्यमांवर व्यक्त होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यातूनच गंभीर प्रकार होत असल्याचे वर्ध्यात घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे. 'माझ्या बॉयफ्रेंडला इंस्टाग्राम आयडीवरून मॅसेज का केला' (why she texted her boyfriend) असा जाब विचारत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने पीडित मुलीला बेदम मारहाण (The schoolgirl hit the other) केली. यात झालेली लाथा बुक्यांची मारहाण इतकी गंभीर होती की पीडित मुलीला अखेर सावंगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिकवणी वर्गातून बोलावून घेतले
त्या मुलीने आधी पीडित मुलीला शिकवणी वर्गातून हनुमान टेकडीवर बोलवले. तेथे तथाकथित बॉयफ्रेंड सोबत ती होती. यावेळी पीडित मुलगी पोहचताच गर्लफ्रेंड असलेल्या मुलीने मॅसेज का केला म्हणत पीडित मुलीला मारहाण सुरू केली. त्यावर पीडित मुलगी मी कुठलाही मॅसेज केला नाही, फेक आयडी तयार करून मॅसेज दुसऱ्याच व्यतीने पाठवला असे सांगीतले. पण तीने बॉयफ्रेंडला तुच मेसेज केल्याचा रागातून तिला जबर मारहाण केली. यात पीडित मुलीची मैत्रीण बचावासाठी धावली तेव्हा सुद्धा तीला मारहाण सुरूच राहिली. त्यामुळे अल्पवयीन कोवळ्या वयात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ठेवण्याच्या स्पर्धेचे आणि समाज माध्यमावर व्यक्त होण्याचे हे प्रकरण मुलीला दवाखान्यात दाखल करण्यापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत गेले. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमी पीडित मुलीच्या जबाब नोंदवून अल्पवयीन मारहाण करणाऱ्या तथाकथित गर्लफ्रेंड आणि तिच्या बॉयफ्रेंडवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा : Bogus Doctor in Nalasopara: डॉक्टर नसताना कम्पाउंडरकडून महिलेवर उपचार; नालासोपाऱ्यामधील धक्कादायक घटना