ETV Bharat / state

वर्ध्यात  बसमधून पिस्तुलसह दहा जिवंत काडतुस जप्त

author img

By

Published : Oct 17, 2019, 8:48 AM IST

येरला नाक्यावर निवडणूक स्थिर निगराणी पथकाने केलेल्या कारवाईत बसमध्ये गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुस  सापडले. याबाबत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

जप्त केलेले पिस्तुल

वर्धा - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर एका बसमध्ये गावठी पिस्तुलासह 10 जिवंत काडतुस सापडले. येरला नाक्यावर निवडणूक स्थिर निगराणी पथकाने ही कारवाई केली.

येरला नाक्यावर बसमधून पिस्तुलसह दहा जिवंत काडतुस जप्त

आंध्र प्रदेशमधून येणारी आदिलाबाद - नागपूर बस येरला नाक्यावर तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणी दरम्यान पथकाला मागील बाजूच्या सीटखाली प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली गावठी पिस्तुल आढळली. पिस्तुल मिळाले म्हणजे काडतुस असणार या आधारावर आणखी शोध घेतला असता 10 जिवंत काडतुस देखील मिळाले. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रवाशांना विचारणा केली. मात्र, सर्वांनी पिस्तुलाची जबाबदारी घेण्याचे टाळले. चौकशीनंतर एका संशयिताला ताब्यात घेतले.

हेही वाचा - मतदारसंघ बदलणाऱ्यांना प्रणितींचा टोला, म्हणाल्या 'मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है'

संशयित शेख हैदर शेख इब्राहिम (34, रा. पोनकल, आंध्रप्रदेश) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित लखनऊला जात असल्याचे समोर आले. याबाबत महिती मिळताच एसडीपीओ भीमराव टेळे, ठाणेदार आशिष गजभिये येरला नाक्यावर पोहोचले. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Intro:वर्धा स्टोरी
mh_war_gavathi_pistul_vis1_7204321

बसमधून पिस्तुलसह दहा जिवंत काडतुस जप्त, पथकाच्या बस तपासणीत उघड

- स्थिर निगराणी तपासणी पथकाची कारवाई

वर्धा - विधानसभा मोठ्या प्रमाणात निवडणूक विभागाकडून नाकेबंदी करत वाहनाची तपासणी मोहीम राबवली जाते. अनुचित प्रकार टाळत निवडणूक पारदर्शक व्हावी. वर्धा जिल्ह्यात स्थिर पथकाने बसची तपासणी करताना चक्क पिस्तुल आणि दहा जीवंत काडतुस सापडले. नागपूर ते हैद्राबाद महामार्गावर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर येरला शिवारात ही पिस्तुल मिळाली. शेख हैदर शेख इब्राहिम वय 34 असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव असून आंध्रप्रदेश राज्यातील असल्याचे पुढे आले.

वर्धा - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर येरला तपासणी नाक्यावर निवडणूक स्थिर निगराणी पथकाकडून तपासणी सुरू होती.
यावेळी आंध्र प्रदेशची AP-01, Z-0045 क्रमांकाची बाहेर राज्यातून येणारी बस असल्याने आदिलाबाद - नागपूर बस थांबण्यात आली. स्थिर निगराणी पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बसची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान पथकाला मागील बाजूच्या सीटखाली प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली गावठी पिस्तुल आढळली.

पथकाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत प्रवाशांना विचारणा केली. पण कुणीही चकार शब्द काढला नाही. चौकशी करताना एका संशयिताला ताब्यात घेतले. बंदूक मिळाली काडतुस असणार या आधारावर बस थांबवलेलता परिसरात शोध घेतला असता 10 जिवंत काडतुस मिळाले. हात बनावटीची म्यागजिन असणारी ही पिस्तुल होती.

संशयिय शेख हैदर शेख इब्राहिम वय 34, राहणार पोनकल, जिल्हा निर्मल, आंध्रप्रदेश अस ओळख सांगितली असून तो लखनऊ ला जात असल्याचे समोर आले. मात्र तो कशासाठी चालला होता याचा शोध वडणेर पोलीस घेत आहे. घटनास्थळी पथकाकडून महिती मिळताच एसडीपीओ भीमराव टेळे, ठाणेदार आशिष गजभिये, यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहचले.

तपासणी पथकात मंडळ अधिकारी अरविंद तूराळे, पोलीस कर्मचारी अजय अवचट, अरुण उघडे, आकाश कसर, अरुण सदावर्ते, अमोल खाडे होमगार्ड पथकाचे सुरज मेश्राम, मनोज धात्रक, शुभम वानखेडे तैनात यांचा समावेश होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.